शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

​‘इन्स्ट्रक्टेबल्स’ अ‍ॅप देईल कलागुणांना चालना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 17:27 IST

आपल्या अंगी असलेले कलागुण, कलाकौशल्य सादर करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. याउलट स्वत:च्या ज्ञानात भर टाकण्यासाठी नाविण्यपूर्ण गोष्टी पाहण्याची बहुतेकजणांना इच्छा असते.

आपल्या अंगी असलेले कलागुण, कलाकौशल्य सादर करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. याउलट स्वत:च्या ज्ञानात भर टाकण्यासाठी नाविण्यपूर्ण गोष्टी पाहण्याची बहुतेकजणांना इच्छा असते. नेमकी हीच निकड लक्षात घेऊन ‘आॅटोडेस्क’चे ‘इन्स्ट्रक्टेबल्स’ हे अ‍ॅप सादर झाले असून, यात नवीन गोष्टी शिकण्याची आणि तुम्ही केलेली नाविन्यपूर्ण गोष्ट जगासमोर ठेवण्याची संधी आपणास मिळते, तेसुद्धा संपूर्णपणे विनामूल्य. उदाहरणार्थ आपणास मोत्यांचे दागिने, माळा किंवा ब्रेसलेट कसे बनतात हे पाहायचे आहे, यासाठी सर्चबारमध्ये योग्य ते शब्द टाका. त्याच्याशी संबंधित असलेले सर्च रिझल्ट येथे दिसतील. त्यातील आवडलेले डिझाईन निवडल्यास त्या प्रकारची कलाकृती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, प्रत्येक टप्प्याची कृती फोटोसहित वाचायला मिळेल. काही ठिकाणी संपूर्ण कृतीचे व्हीडिओदेखील उपलब्ध आहेत.याठिकाणी हस्तकला व्यतिरिक्त तंत्रज्ञानासंबंधीदेखील कृती उपलब्ध आहेत. जसेकी लॅपटॉपच्या जुन्या बॅटरीजचा उपयोग करून पॉवरबँक तयार करणे. रासबेरी-पाय मायक्रो संगणक वापरून केलेली प्रोजेक्ट्स. रुबिक्स क्यूब सोडवणारा, ड्रॉइंग काढणारा, चेस खेळणारा रोबो बनवणे आणि यांसारखे इतर अनेक. तसेच नाविन्यपूर्ण केक्स, पास्ता, सॅलड्स, कॉफीचे वेगवेगळे प्रकार आदी पाककृती करून केलेले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी माहिती येथे उपलब्ध आहे. शिवाय आपण स्वत: बनवलेली कलाकृती, पाककृती, एखादे कॉम्प्युटर अ‍ॅप, विज्ञानातील एखादा प्रयोग आदी लोकांपर्यंत शेअर करायचे असल्यास येथे अपलोड करु शकता. यासाठी आपणास मुख्य पेजच्या वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या कॅमेऱ्याच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर प्रोजेक्टला नाव देऊन त्याचा प्रकार, उपप्रकार इत्यादी निवडायचा असतो. त्यानंतर प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेले फोटो, व्हिडीओज आणि इतर फॉरमॅटमधील फाइल्स जसे की, फाइल्स वगैरे अपलोड करता येतात. आवश्यक असलेल्या सर्व स्टेप्स येथे टाइप करून तुमचे प्रोजेक्ट या साइटवर प्रसिद्ध करता येते. सतत काही तरी नवीन करू इच्छिणाऱ्याना, आपले ज्ञान आणि कला इतरांसमोर मांडून त्याचा जास्तीत जास्त लोकांना वापर करता यावा अशी इच्छा असलेल्या सर्वांसाठी हे अतिशय प्रभावी माध्यम आहे.