इन्स्टाग्राम करतेय कमेंट पॉलिसी कडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 19:09 IST
इन्स्टाग्रामवर होणारी ‘आॅनलाईन हॅरॅसमेंट’ टाळण्यासाठी युजर्सना त्यांच्या फोटोवरील कॉमेंट्सवर नियंत्रण ठेवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
इन्स्टाग्राम करतेय कमेंट पॉलिसी कडक
फोटो शेअरिंग वेबसाईट/अॅप इन्स्टाग्राम थोड्याच कालावधीमध्ये नेटिझन्समध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली. परंतु अभद्र आणि तिरस्कारयुक्त कॉमेंट्सचा जसा सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्रास होतो तो इन्स्टाग्रामवरदेखील आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता कंपनीने युजर्सना नवे टूल्स/सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.इन्स्टाग्रामवर होणारी ‘आॅनलाईन हॅरॅसमेंट’ टाळण्यासाठी कंपनीने युजर्सना त्यांच्या फोटोवरील कॉमेंट्सवर नियंत्रण ठेवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे तुमच्या फोटोवर कोणी असभ्य कॉमेंट लिहिली तर ती तुम्ही डीलिट किंवा कॉमेंट करण्याचा आॅप्शनच बंद करू शकता.‘इन्स्टाग्राम यूजर्सना केवळ चांगलाच अनुभव यावा म्हणून कंपनीने नवे धोरण स्वीकारले असून मैत्रीपूर्ण, मजेशीर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यक्त होण्याचे सर्वोत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू असल्याचे कंपनीच्या सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख निक जॅक्सन कोलॅको यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात कॉमेंटस् मिळणाऱ्या अकाउंटस्नाच ही सुविधा देण्यात आली आहे; परंतु हळूहळू सर्व यूजर्सना ती देण्यात येणार आहे. कंपनीची स्वत:चीदेखील असभ्य व अक्षेपार्ह कॉमेंटस्विषयी पॉलिसी आहे. अलिकडे कंपनीने व्यावसायिक अकांउटस्साठी कॉमेंट मॉडरेशन टूल लाँच केले आहे. त्यानुसार यूजर्स अश्लील व घृणास्पद वाक्यप्रयोग ब्लॉक करू शकतात.