भारतीय मुलींची पताका साता समुद्रापार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:40 IST
भारतीय मुली आता देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील आपल्या कतृत्त्वाचा ठसा उमटवित आहेत
भारतीय मुलींची पताका साता समुद्रापार
भारतीय मुली आता देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील आपल्या कतृत्त्वाचा ठसा उमटवित आहेत. युद्धक्षेत्रातील भयानता असो किंवा विज्ञानाचे क्षेत्र अशा सर्वच ठिकाणी त्यांचे यश देशाचे नाव उज्जवल करीत आहेत. या आठवड्यात दोन भारतीय मुलींनी अमेरिकेत मिळविलेले यश सर्वांना उत्साहित करणारे आहे. बेंगलुरूच्या अनिशा आचार्यने आपल्या कौशल्याने आस्करचा सुवर्णवेध साधला आहे तर ओडीशाच्या ललिता श्रीसाई हीने नव्या संशोधनाचा मार्ग प्रशस्त केला आहे. 'ऑस्कर सुवर्ण'वेध बेंगरूलुच्या अनिशा आचार्यने त्याच्या 'डे वन' चित्रपटासाठी विद्यार्थी श्रेणीतला ऑस्कर सुवर्ण पुरस्कार मिळविला आहे. ती सध्या अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट संपादनाची पदव्युत्तर पदवी घेत आहे. 'डे वन' हा 25 मिनिटाचा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 2015 च्या विद्यार्थी ऑस्कर पुरस्कारात नॅरेटिव्ह कॅटेगिरीमध्ये तीला हा पुरस्कार मिळाला आहे. अफगान-अमेरिकन महिला जी अमेरिकन सैन्यात इंटरपिटर (अनुवादक) म्हणून काम करत आहे, तिच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. अफगानीस्थानमध्येअसताना नायिकेला ा एका गरोदर महिलेच्या मुलाखती दरम्यान तिची पीडा कळते. या महिलेचा नवरा दहशतवादी संघटनेचे काम करतो. बाळंतपणासाठी नायिकेने केलेली मदत हे या चित्रपटाची मुख्य थीम आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक हॅन्री ह्युजेस यांनी केले आहे. अनिशाने या चित्रपटाचे संपादन केले आहे. हा अनिशाच्या अभ्यासाचा भाग असला तरी देखील ऑस्कर मिळविणे हा माझा सन्मानच आहे असे तिला वाटते. अनिशा ही प्रसिद्ध लेखक आणि नाटककार दिवंगत सीके नागराजा राव यांची नात आहे.ललिताची गुगल भरारीओडीसातील 13 वर्षीय मुलीने मक्याच्या कणसांपासून जल शुद्धीकरण यंत्र बनविले आहे. गुगल विज्ञान यात्रेत विजेतेपद मिळविल्याने तिच्या संशोधनाचे महत्त्व लक्षात येते. सत्या नडेला असो किंवा सुंदर पिचाई असो भारतीयांनी नेहमीच जागतिक स्तरावर यशस्वीतेची गाथा सादर केली आहे. एका बाजुला जिथे भारतीय मुलांचे किशोरवयीन मुले सेन्सर स्टिकापासून असे काही तरंग निर्माण करीत आहेत की ज्यामुळे कर्णबधिरांना तेल सांडल्यानंतर सुद्धा जाणवेल, आणि आता दूसर्या बाजुला ओडिसातल्या या तेरा वर्षीय मुलीने गुगल विज्ञान यात्रेत हा आविष्कार सादर केला आहे.नवव्या इयत्तेतील ललिता श्रीसाई हिने या कॅलिफोर्निया येथे भरलेल्या या यात्रेत नुकतेच कम्युनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड हा पुरस्कार नुकताच मिळविला आहे.