शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषप्रधान क्षेत्रात वाढतोय महिलांचा दबदबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 18:30 IST

फ्रान्समध्ये विज्ञान शिक्षकाच्या नोकरीसाठी महिलांना पुरुषांपेक्षा जास्त प्राधान्य देण्यात येते.

स्त्री-पुरूष समानसंधी या चवीने चर्चिल्या आणि अभ्यासल्या जाणाऱ्या विषयात एक आश्चर्यकारक तथ्य समोर आले आहे. फ्रान्समध्ये विज्ञान शिक्षकाच्या नोकरीसाठी महिलांना पुरुषांपेक्षा जास्त प्राधान्य देण्यात येते तर साहित्य व परदेशी भाषांसारख्या महिलाप्रधान क्षेत्रांमध्ये पुरुषांना झुकते माप देण्यात येते.गणित आणि विज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये महिलांना डावलण्यात येते अशा सर्वसाधरण समजुतीच्या विरोधात जाणारे हे निष्कर्ष आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान, विज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित इ. क्षेत्रांत महिलांचा टक्का वाढवण्याच्या मुद्यावर नव्याने विचार करण्याची गरज आहे का, असा प्रश्नदेखील यामुळे उपस्थित होतो.महिलांप्रती असणाऱ्या पूर्वग्रहांच्या आधारावर त्यांना डावलण्यात येत आणि म्हणून वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी असल्याचा युक्तीवाद केला जातो. याविषयी सखोल अभ्यास करण्यासाठी ‘पॅरिस स्कू ल आॅफ इकोनॉमिक्स’च्या थॉमस ब्रेडा आणि मेलिना हिलियन यांनी फ्रान्समध्ये माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षकांची भरती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला.या दोघांनी २००६ -१३ दरम्यान घेण्यात आलेल्या लेखी व मौखिक परीक्षांच्या निकालाचा तुलनात्मक अभ्यास केला असता त्यांना दिसून आले की, विज्ञानशिक्षकाच्या पदासाठी मौखिक परीक्षेच्या परीक्षकांनी महिलांना पुरुषांपेक्षा अधिक गुण दिले. तसेच महिलांचे वर्चस्व असणाऱ्या पदांसाठी मात्र पुरुषांना प्राधान्य देण्यात आले. आहे का नाही कमाल.