‘रिंग टॅटू’ने करा तुमच्या व्हॅलेंटाईनला इम्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:50 IST
व्हॅलेंटाईन डे रोजी प्रेम व्यक्त करणार असाल आणि तो क्षण तुम्हाला आयुष्यभर आठवणींमध्ये कैद करायचा असेल तर
‘रिंग टॅटू’ने करा तुमच्या व्हॅलेंटाईनला इम्प्रेस
टॅटू आर्टिस्ट माईक मार्टिन सांगतो की, ‘माझ्याकडे आठवड्यातून किमान एक तरी जोडपे रिंग टॅटू बनविण्यासाठी येते. यामध्ये नुकतेच लग्न झालेली जोडपी जास्त असतात. आपले प्रेम टॅटूप्रमाणे कधीच मिटणार नाही अशी त्यामागची धारणा असते.‘14 फेब्रुवारी’ची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली असून दररोज काही ना काही खास दिनविशेष आहे. तुम्ही जर यंदाच्या व्हॅलेंटाईन डे रोजी प्रेम व्यक्त करणार असाल आणि तो क्षण तुम्हाला आयुष्यभर आठवणींमध्ये कैद करायचा असेल तर तिला डायमंड रिंग न देता ‘रिंग टॅटू’ने प्रोपोज करा. तुमच्या बोटावर रिंगचा टॅटू गोंदवून तुमच्या निस्सिम प्रेमाची कबुली देण्यासारखा उत्तम मार्ग नाही.‘एकदा तुम्ही जोडीदारासोबत संपूर्ण जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेता, तेव्हा माघार नाही घेऊ शकत. आयुष्यभराची कमिटमेंट दर्शविण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणून मी रिंग टॅटू करून घेतला. लग्नाचे पवित्रबंधन केवळ एका वस्तू नाही तर ती आमच्या शरीराचा भाग असला पाहिजे असा आमचा विचार होता,’ असे क्रिस्टोफर फोर्स्लेने सांगितले. तो कॉमिक बुक लेखक आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्याने केक मेकर सेराह पॅटर्सनशी विवाह केला. स्वस्त, पर्मनंट आणि कोणताही बडेजाव किंवा दिखाऊपणा नाही अशा कारणांमुळे रिंग टॅटूची प्रेमवीरांमध्ये क्रेझ वाढू लागली आहे. टॅटू आर्टिस्ट माईक मार्टिन सांगतो की, ‘माझ्याकडे आठवड्यातून किमान एक तरी जोडपे रिंग टॅटू बनविण्यासाठी येते. यामध्ये नुकतेच लग्न झालेली जोडपी जास्त असतात. आपले प्रेम टॅटूप्रमाणे कधीच मिटणार नाही अशी त्यामागची धारणा असते. साखरपुडा झालेली जोडपी सहसा येत नाहीत. कारण विवाह निश्चित होऊनही लग्न होईल असे सांगता येत नाही.’