मी अद्यापही सिंगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:01 IST
‘एक था रस्टी’या कथासंग्राहतून रस्किन बॉण्ड यांनी आपल्या प्रेमकथांचा उलगडा तर के ला नाही ना!
मी अद्यापही सिंगल
रस्किन बॉण्ड माहित नाही, असा इंग्लिश साहित्यप्रेमी सापडणे दुर्मिळच. त्यांनी लिहिलेल्या लव्ह स्टोरीजचे दिवाने जगभरात आहेत.81 व्या वषीर्ही त्यांचा उत्साह दांडगा आहे. बॉण्ड अलीकडेच जयपूर आणि कोलकाता येथील साहित्य महोत्सवात सामील झाले होते. तेथे त्यांनी विविध प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. ‘ट्विटर’वर अकाऊंट उघडल्यावर यासंदभार्तील प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्कील उत्तर दिले.मच्या शैलीदार प्रेमकथा वाचून अनेकांना प्रेमात पडण्याची प्रेरणा मिळाली. प्रेमाबाबत तुमचे अनुभव काय, या प्रश्नावर ते हसत हसत म्हणाले, ‘प्रेम’ या विषयातील मी तज्ज्ञ कधीच नव्हतो. माझ्या बहुतांश प्रेम प्रकरणांचा शेवट दु:खद झाला.यामुळेच मी अद्यापही सिंगल आहे.’ ‘एक था रस्टी’या कथासंग्राहतून रस्किन बॉण्ड यांनी आपल्या प्रेमकथांचा उलगडा तर के ला नाही ना!