शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक दुफळी नुकसानकारक ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 04:03 IST

 दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा कोणी दिल्या याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात एबीव्हीपी विरुद्ध अन्य विद्यार्थी संघटना यांच्यात वाद रंगला आहे. जेएनयू वादाचे पडसाद आता देशभर उमटायला लागले आहेत. विद्यार्थी घडविणाºया संस्थेत असे राजकारणाचे डावपेच खेळले जात आहेत. हा घाणेरडा प्रकार बघून विद्यार्थीही स्तब्ध झाले आहेत. या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला खुशाल शिक्षा करावी. परंतु पुर्वाग्रह ठेवून वा सुडापोटी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नये, असा एक मतप्रवाह आहे. तर देशात राहून देशविरोधी कारवाया कशा खपवून घ्यायच्या, अशा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. या निमित्ताने सीएनएक्सने शहरातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी या विद्यार्थ्यांनी अगदी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या आंदोलनावरून देशभरात राजकीय, सामाजिक पातळीवर चर्चा सुरू आहेत, पण आता एका तपास संस्थेने याबाबत दिलेली माहिती जरा वेगळी आहे. ज्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो विद्यार्थी नेता कन्हैयाने देशविरोधी नारे लावलेच नाहीत असे यात म्हटले आहे. यावरून हा वाद आणखी चिघळला असून या विषयावरून देशातील माहोल बिघडवला जात असल्याचा आरोप करीत देशभरातील विद्यार्थी संघटना मैदानात उतरल्या आहेत. यावरून विद्यार्थ्यांमध्येही वैचारिक दुफळी निर्माण होत असून ती देशहिताची नाही, याकडे शहरातील तरुणाईने लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांचे करिअर बिघडू नयेजवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा कुणी दिल्या असतील असे मला वाटत नाही. यात काही तरी षडयंत्र आहे. नाही तर हा वाद इतका चिघळलाच नसता. परंतु अजूनही स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण जर हा वाद अधिक चिघळला तर याचे परिणाम नक्कीच वाईट असतील. विद्यार्थ्यांच्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. - नताशा पाटीलयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे म्हणणार?काही विद्यार्थ्यांनी खरचं देशविरोधी नारे लावले असतील तर हे योग्य नाही. याकूब मेमन व अफजल गुरूच्या फाशीला विरोध करीत ते भारताच्या संविधानाचा अपमान करीत आहेत. याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणता येणार नाही. अशी विचारसरणी कायद्याचा भंग करणारी आहे. कुठल्याही परिस्थिीत कायद्याचे पालन झालेच पाहिजे. ते झाले नाही तर सामाजिक आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होईल.          - निलम काकडेआपल्या सोयीने विरोध करणे योग्य नाही ेजेएनयूमध्ये अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व आंदोलने होत असल्याचे आपण बघत असतो. यापूर्वी काहींनी नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याच्या बातम्या आल्या होत्या. येथे कधी २६/११ वा पठाणकोट हल्ल्याच्या विरोधात आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही. अशी दुहेरी भूमिका नको. जी गोष्ट चूक आहे तिला विरोध व्हायलाच हवा. आपल्या सोयीने विरोध करणे योग्य नाही.    - अंजलि कोडवानी प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार या प्रकरणी कुलगुरूंनी पुढाकार घेऊन प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे सोडून दबावाखाली येऊन पूर्वग्रहाने कारवाई केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. देशविरोधी नाºयाचे मी समर्थन करीत नाही. परंतु प्रत्येक नागरिकाला आपले विचार मांडण्याचा हक्क आहे. जेएनयूचे विद्यार्थी जर काही विधायक बाबींकडे लक्ष वेधत असतील तर कोणतेही सरकार विद्यार्थ्यांना त्यांची मते मांडण्यापासून रोखू शकत नाही. विद्यार्थी संघटनांच्या राजकारण, संवाद व वैचारिक वादातूनच तरुणांमध्ये लोकशाही मूल्ये रुजत असतात.    - अनुपम करांगळेउद्याच्या स्वर्णिम भारताच्या स्वप्नाचे काय?जेएनयूमध्ये सध्या जे काही घडत आहे ते फारच वाईट आहे. जेएनयूच्या काही विशिष्ट विद्यार्थ्यांना निशाण्यावर धरले जात आहे. हे योग्य नाही. विद्यापीठातील या वादाचे कुणी राजकारण करू नये. या प्रकरणाला वेगळे वळण का देण्यात येत आहे हे कळत नाही. शिकायच्या वयात विद्यार्थी असे कारागृहात जाणार असतील तर या देशाने पाहिलेल्या स्वर्णिम भारताचे स्वप्न कसे साकार होईल?            -  शुभम मानकरत्वरित निपटारा होणे गरजेचेया प्रकरणात आतापर्यंत दोषी आढळलेल्या विद्यार्थांवर कारवाई होऊन याचा निपटारा होणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ होऊ नये. लवकारत लवकर या प्रकरणावर तोडगा निघायला हवा. विद्यार्थी घडविणाºया संस्थेत जर अशा प्रकारे घाणेरडे राजकारण होत असेल तर त्याचा परिणाम इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर देखील पडू शकतो. हे राजकारण करणाºयांनी लक्षात घ्यायला हवे. - तेजस बन्सोड