शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सध्या ट्रेन्डमध्ये आहे मोनोक्रोम लूक; या बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 17:15 IST

जर तुम्हाला इतर रंगांपेक्षा व्हाइट आणि ब्लॅक कलर जास्त आवडत असेल तर त्यामध्ये निराश होण्याची गरज नाही. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये ब्लॅक अॅन्ड व्हाइट मोनोक्रोम लूक ट्रेन्डमध्ये आहे.

जर तुम्हाला इतर रंगांपेक्षा व्हाइट आणि ब्लॅक कलर जास्त आवडत असेल तर त्यामध्ये निराश होण्याची गरज नाही. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये ब्लॅक अॅन्ड व्हाइट मोनोक्रोम लूक ट्रेन्डमध्ये आहे. प्रत्येक बॉलिवूड अभिनेत्री या मोनोक्रोम लूकला वेगवेगळ्या पद्धतींनी कॅरी करताना दिसत आहे. अशातच तुम्हीही या सेलिब्रिटींकडून मोनोक्रोम लूक वेगवेगळ्या स्टाइलमध्ये ट्राय करण्याच्या टिप्स घेऊ शकता. 

मोनोक्रोम सूट लूक 

तुम्ही अनुष्का शर्माप्रमाणे ऑफ-शोल्डर ब्लाउजला फ्लेयर्ड पॅन्टसोबत परिधान करू शकता. त्यावर फ्लॅट्स किंवा किटेन हिल्स ट्राय करून तुमचा लूक आणखी खुलवू शकता. हा लूक तुमच्यासाठी परफेक्ट ऑफिस लूक ठरेल. जर तुम्हाला ऑफ शोल्डर ब्लाउज परिधान करायचा नसेल तर कृति खरबंदाप्रमाणे लॉन्ग जॅकेट किंवा ब्लेझर वापरू शकता. 

मोनोक्रोम स्कर्ट लूक

फक्त वेस्टर्न ऑफिस वेअरमध्येच नाही तर तुम्ही ट्रेडिशनल इंडियन वेअरमध्येही ब्लॅक अॅन्ड व्हाइट वापरू शकता. श्रद्धा कपूरने फॅशन डिझायनर पुनीत बालानाचं क्रिएशन असलेला मोनोक्रोम स्कर्ट वेअर केला होता. कॉन्ट्रास्टिंग प्रिंट असलेला स्कर्ट आणि क्रॉप टॉप लूक एखाद्या समारंभामध्ये किंवा लग्नसोहळ्यामध्ये वेअर करण्यासाठी परफेक्ट असतात. 

शॉर्ट अॅन्ड सिंपल 

आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे या दिवसांत जान्हवी कपूरही बॉलिवुडची फॅशन दीवा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. जान्हवीचा हा लेटेस्ट ब्लॅक अॅन्ड व्हाइट मोनोक्रोम लूकही तुम्ही ट्राय करू शकता. जान्हवीचे ड्रेस डिझायनर कुणाल रावल ने डिझाइन केला आहे. यामध्ये जान्हवीने ब्लॅक शॉर्ट्सवर व्हाइट जॅकेट वेअर केलं आहे. तुम्ही व्हाइट टि-शर्टही वेअर करू शकता आणि त्यावर ब्लॅक ब्लेझर किंवा जॅकेट वापरू शकता. या आउटफिटवर पंप हिल्स किंवा थाय-हाय ब्लॅक बूट्सही वेअर करू शकता. 

वन-पीस ड्रेस लूक 

आपल्या या ब्लॅक अॅन्ड व्हाइट वन पीस ड्रेससोबत ब्लॅक कलरच्या बेल्टसोबत कंगना राणौतने या ड्रेसच्या लूक आणखी खुलवला आहे. हा एक असा ड्रेस आहे जो तुम्ही फॉर्मल किंवा कॅज्युअल दोन्ही प्रकारे परिधान करू शकता. 

जीन्स अॅन्ड टी-शर्ट 

जर तुम्ही काय वेअर करायचं या विचारात असाल तर ब्लॅक जीन्सवर व्हाइट टी-शर्ट किंवा व्हाइट जीन्सवर ब्लॅक टी-शर्ट वेअर करू शकता. जॅकलीन फर्नांडिसचे हे फोटो तुमच्यासाठी बेस्ट उदाहरण आहेत. 

टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स