ऑनलाईन जुगाराचे व्यसन कसे रोखणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:18 IST
जुगाराचे व्यसन अशी गोष्ट आहे जी सुटता सुटत नाही. त्यातल्या त्य...
ऑनलाईन जुगाराचे व्यसन कसे रोखणार?
जुगाराचे व्यसन अशी गोष्ट आहे जी सुटता सुटत नाही. त्यातल्या त्यात ऑनलाईन गॅम्बलिंगचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बर्याच लोकांना ऑनलाईन जुगार खेळल्याशिवाय राहवतच नाही. मात्र एका स्टडीमधून असे दिसून आले, की प्लेयर्सला आहारी जाण्याआगोदरच धोक्याची पूर्वसूचना मिळाली तर पुढचा त्रास टाळता येऊ शकतो. जर समजा एखाद्या व्यक्तीमध्ये जुगाराच्या आहारी गेल्याचे लक्षणे वाढू लागली की त्याला थांबविण्याची सुविधा असावी. इंग्लंडमधील इंजिनीअरिंग अँड फिजिकल सायन्स रिसर्च कॉऊं सिल (ईपीएसआरसी) मुख्य कार्यकारी फिलिप नेल्सन म्हणतात की, 'आम्ही हाती घेतलेल्या प्रोजेक्टमुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगद्वारे विविध सामाजिक समस्या सोडविल्या जाऊ शकतात. आम्ही विकसित केलेल्या सिस्टिमद्वारे व्यक्तीला जुगाराचे व्यसन लागण्याच्या शक्यता ८७ टक्क्यांपर्यंत बरोबर सांगता येतात.photo source-getty images