घरगुती कामगार झाली आकर्षक मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 02:56 IST
मनदीप नागी या प्रसिद्ध डिझायनरने कमाल केली
घरगुती कामगार झाली आकर्षक मॉडेल
मनदीप नागी या प्रसिद्ध डिझायनरने एक कमाल केली आहे. त्यांनी घरगुती कामगार कमला (नाव बदलले आहे) हिला चक्क मॉडेल बनवून प्रकाशझोतात आणले आहे. शिफॉन सारी आणि ट्राऊजरवर काम करताना ही कमला खूपच आकर्षक दिसते. तिला पाहिल्यानंतर कोणीही म्हणू शकणार नाही, ती मॉडेल नाही. जेव्हा मनदीप यांनी कमला यांना सिनामोन कलेक्शनसाठी मॉडेलिंग करण्याविषयी विचारले, त्यावेळी त्या गोंधळल्या. काही कालावधीनंतर त्यांनी काम करण्यास होकार दिला आणि आपल्या परिश्रमाने कॅमेºयासमोर इतिहास घडवत त्यांनी सर्वांनाच मागे टाकले.