सुंदर दिसण्यासाठी घरघुती उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:33 IST
झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी सॅलिसिलिक अॅसिड असणाºया क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम. अशा प्रकारच्या काळजीने त्वचा चमकदार आणि मुलायम बनते. तसेच पिंपल्सची समस्या येत नाही.
सुंदर दिसण्यासाठी घरघुती उपचार
झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी सॅलिसिलिक अॅसिड असणाºया क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम. अशा प्रकारच्या काळजीने त्वचा चमकदार आणि मुलायम बनते. तसेच पिंपल्सची समस्या येत नाही. यानंतर मिल्क असणारे मॉईश्चरायजर वापरावे. यामुळे त्वचेस पुरेसे मॉइश्चर मिळते. पाय धुतल्यानंतर पायांना आॅलिव आॅईलने मसाज करा. झोपण्यापूर्वी सॉक्स घातले असतील तर सकाळी तुम्हाला सॉक्स काढल्यानंतर सुंदर पाय पहायला मिळतील.व्हिटॅमिन ई चा समावेश असणारे आॅईल किंवा बदाम आॅईल झोपण्यापूर्वी ओठांवर लावल्यास तुमचे ओठ चमकदार गुलाबी दिसतील. नखे खूप पातळ आणि ब्रीटल झाल्यास ते खूप विचित्र दिसू लागते, त्यासाठी झोपण्यापूर्वी नखांवर कोकोनट आॅईल लावा. त्वचेच्या काळजीसाठी त्वचेवर व्हिटॅमिन इ लावावे आणि त्यासाठी हातात ग्लोव्ज घालावेत.