लंडनच्या मध्य भागात ११०० खोल्यांचे ऐतिहासिक ‘ओल्ड वॉर आॅफिस’वर आता हिंदुजा घराण्याची मालकी असेल. दुसºया महायुद्धादरम्यान या ऐतिहासिक भवनात पंतप्रधान विंस्टन चर्चिल राहत होते. हिंदुजा घराण्याने अलीकडे हे भवन खरेदी केले. आता या भवनाचा जिर्णोद्धार करून याठिकाणी एक पंचतारांकित हॉटेल आणि अलिशान अपार्टमेंट उभे राहणार आहे. ब्रिटनची संसद आणि पंतप्रधान कार्यालय या भवनापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मंगळवारी लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘ओल्ड वॉर आॅफिस’च्या सात मजली इमारतीची चाबी हिंदुजा समूहाचे सहअध्यक्ष जीपी हिंदुजा, त्यांचे बंधू व युरोपमधील समूहाचे अध्यक्ष पीपी हिंदुजा तसेच स्पेनमधील त्यांचे भागीदार व विल्लार मीर समूहाचे चेअरमन जुआन मिगुएल विल्लार मीर यांना सोपवली गेली.