शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

​हाय हिल्सने वाढतो तरुणींचा आत्मविश्वास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 21:07 IST

सौंदर्यात अधिक भर पाडण्यासाठी तरुणी रंगभूषा, आभूषणे, अलंकार, केशरचना, वेशभूषा आदी गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करीत असतात. त्यासोबतच फूटवेअरची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते.

सौंदर्यात अधिक भर पाडण्यासाठी तरुणी रंगभूषा, आभूषणे, अलंकार, केशरचना, वेशभूषा आदी गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करीत असतात. त्यासोबतच फूटवेअरची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. हे फूटवेअर केवळ सुंदर असून चालत नाहीत, तर ते घालून चालताना एक वेगळा आत्मविश्वास जाणवला पाहिजे. असाच आत्मविश्वास देण्याचे काम हाय हिल्स सॅण्डल करीत असतात.डिटॅचेबल शूज.. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला वापरत असाल तर तो खर्च बजेटच्या बाहेर जाण्याची शक्यता असते. यासाठी तो खर्च वाचविण्यासाठी डिटॅचेबल शूज हा उत्तम पर्याय आहे. डिटॅचेबल शूज म्हणजे तुम्ही या सँडल्सचा वरचा किंवा विशिष्ट भाग हव्या असलेल्या रंगात बदलू शकता. समजा तुमच्याकडे हाय हिल्स आहेत त्याची डिटॅचेबल शूजमध्ये सोबत अटॅचमेंट करून त्याला हवा तो लूक देता येतो. काहींमध्ये सँडल्सचे रंगीबेरंगी बेल्टही उपलब्ध असतात. तुम्ही कपड्याच्या रंगात ते बेल्ट्स बदलू शकता. काहींसोबत वेगवेगळ्या आकारातले आणि रंगातले पॅटर्न असतात. मात्र हे जरा जास्तच खर्चिक आहे हे नक्की. किटन हिल्स     उंची जास्त असणाºया स्त्रियांना हिल्स घालण्याचा मोह असेल तर किटन हिल्स हा उत्तम पर्याय आहे. यात कमी उंचीच्या हिल्स उपलब्ध असतात. त्यामुळे उंच महिलांना फॅशनेबल लूक हवा असल्यास या हिल्सचा वापर करता येतो. पंप्स     दोन ते तीन इंचाच्या या हिल्सच्या समोरचा भाग हा अत्यंत कमी असतो. त्यामुळे पायाचा खूप कमी भाग झाकला जातो. नखांचा काही भाग यामुळे झाकोळला जातो.स्टेली टोस     या प्रकारच्या हिल्स ह्या सगळ्यात उंच प्रकारच्या गणल्या जातात. याच्या तळाला सुमारे एक ते दीड इंचाचा पृष्ठभाग असतो. त्यामुळे उंच असूनही त्यावर तोल सावरणे शक्य होते. वेजेस    या प्रकारात बोटांपासून टाचांपर्यंतचा भाग हा एकसंध जोडलेला असतो. बोटांकडील भाग हा खाली असून टाचेकडील भाग हा उंच असतो. वेजेस प्रकारामध्ये सँडल आणि हिल्स अशा दोन्ही प्रकारामध्ये हे उपलब्ध आहेत. कोन हिल्स    या हिल्सचा पुढील भाग निमुळता असून पाठीमागील हिल्स आयस्क्रीमच्या कोनाप्रमाणे असतो. त्यामुळे याप्रकाराला ‘कोन हिल्स’ म्हटले जाते. कन्व्हर्टेबल हिल्स     सॅण्डल्ससाठी जास्त खर्च करण्याची तयारी असल्यास कन्व्हर्टेबल हिल्स वापरु शकता. कारण ह्या प्रकारच्या सॅण्डल्स जरा जास्तच महाग असतात. यात उंच टाचा अगदी सहज कमी-जास्त करू शकता. अशा प्रकारच्या सँडल्सना तुम्ही कॅट हिल किंवा पॉइंटेड हिल्स करू शकता. जुन्या हिल्स बाजूला काढून ठेवून तुम्हाला हव्या त्या सोयीची सॅण्डल्सचे हिल्स कमी-जास्त करू शकता. शिवाय त्याचा तुम्ही फ्लॅट सँडल्स म्हणून वापरु शकता.  जेल कुशनहाय हिल्स वापरणाºयांसाठी आनंद देणारी वस्तू म्हणजे ‘जेल कुशन’ होय. याला ‘शू पॅडिंग’ असेही म्हणतात. हाय हिल्स घातल्याने शरीराचा भार कधीकधी टाचांवर आणि पुढच्या भागावर अधिक आल्याने पायांच्या तळव्यांची जळजळ होणे, ते दुखणे, सूज पकडणे हे त्रास सुरू होतात. या हिल्सच्या तळव्याचा भागही कडक असतो त्यातून त्रास अधिक होतो. या सगळ्या त्रासापासून जेल कुशन मुक्त करतात. पायाचे विशिष्ट प्रेशर पॉइंट असतात. त्या प्रेशर पॉइंटच्या ठिकाणी हे जेल कुशन बसवायचे असतात. टाच, तळवा, पायांची बोटे अशा तीन महत्त्वाच्या प्रेशर पॉइंटवरच्या ठिकाणी लावायला वेगवेगळ्या आकारात या कुशन येतात. या कशा वापरायच्या याचे मार्गदर्शन त्यात केलेले असते. या कुशन पायांचे संरक्षण करतात. या वापरल्यामुळे कोणत्याही एका पॉइंटवर जास्त दाब येत नाही. त्याचप्रमाणे या नरम आणि मऊ  असल्याने तळव्यांची जळजळ, सूजही येत नाही. एक कुशन तुम्ही अनेक वेळा वापरू शकता. हाय हिल्स वापरताना हे लक्षात ठेवा.. हाय हिल्स चपला फक्त रोज थोड्या वेळासाठीच वापराव्यात. कारण सतत हाय हिल्स वापरल्या तर मेंदूला रक्त पुरवठा करणाºया वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ  शकतो. उंच टाचेच्या चपला घेताना त्या चपला चांगल्या दर्जाच्या असतील, याची काळजी घ्या. नेहमीच्या वापरात साधारण एक इंच उंच टाचा असणाºया चपला वापरणे शरीरासाठी योग्य असते.