मेकअपविना उंदिरासारखी दिसते हेलेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 11:40 IST
अभिनेत्री हेलेन जॉर्जचे म्हणणे आहे की, ती मेकअपविना बाहेर जावूच शकत नाही. कारण ती उंदिरासारखी दिसते. मी इतर मुलींसारखी नाही, ज्या मेकअपविनाच बाहेर फिरू शकतात, असेही तिने सांगितले.
मेकअपविना उंदिरासारखी दिसते हेलेन
अभिनेत्री हेलेन जॉर्जचे म्हणणे आहे की, ती मेकअपविना बाहेर जावूच शकत नाही. कारण ती उंदिरासारखी दिसते. मी इतर मुलींसारखी नाही, ज्या मेकअपविनाच बाहेर फिरू शकतात, असेही तिने सांगितले. सध्या जॉर्जने तिच्या मेकअपकडे विशेष लक्ष दिले असून, सध्या तिला भविष्यातील सौदर्याबाबतची चिंता सतावत आहे. याबाबत जॉर्जने सांगितले की, ती सीरम आणि डोळ्याला क्रीम लावते. शिवाय दर दोन आठवड्याला फेशल करते. यामागचा उद्देश तिला वयाच्या पन्नाशीनंतरही तरुण दिसायचे आहे.