८ एप्रिलला ‘हार्डकोर हेनरी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 01:25 IST
निर्माता इल्या नॅशुल्लरचा ‘हार्डकोर हेनरी’ हा चित्रपट भारतात येत्या आठ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. गेल्या वर्षी टोरॅँटो आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.
८ एप्रिलला ‘हार्डकोर हेनरी’
निर्माता इल्या नॅशुल्लरचा ‘हार्डकोर हेनरी’ हा चित्रपट भारतात येत्या आठ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. गेल्या वर्षी टोरॅँटो आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. त्यात त्याला ‘ग्रोल्श पीपुल्स चॉईस मिडनाइट मॅडनेस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटात हेनरीच्या पत्नीचे अपहरण केले जाते. त्यानंतर निर्माण होणाºया रहस्यमयी घटनांवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात अभिनेता शाल्टरे कोप्ले, डेनिला कोज्लोवस्की, हॅली बॅनेट, आंद्रेई देमन्तीव, डार्या चारूशा आणि स्वतेलाना उस्तिनोवा यांची प्रमुख भूमिका आहे. भारतात पीवीआर पिक्चर्सने या चित्रपटाचे अधिकार खरेदी केले आहेत.