गुलजार-भारद्वाज एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:43 IST
‘द जंगल बुक’ हा चित्रपट यूएसमध्ये रिलीज करण्याअगोदरच भारतात रिलीज केला जाणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात ‘चड्डी पहन के फूल खिला है’ हे प्रसिद्ध गाणे देखील पुन्हा रिलीज केले जाणार आहे.
गुलजार-भारद्वाज एकत्र
‘द जंगल बुक’ हा चित्रपट यूएसमध्ये रिलीज करण्याअगोदरच भारतात रिलीज केला जाणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात ‘चड्डी पहन के फूल खिला है’ हे प्रसिद्ध गाणे देखील पुन्हा रिलीज केले जाणार आहे. गुलजार यांनी लिहलेले हे गाणे नव्वदच्या दर्शकात प्रचंड गाजले होते. विशाला भारद्वाजद्वारा तयार केलेले हे गाणे जंगल बुकच्या हिंदी वर्जनमध्ये पुन्हा बघायाला मिळणार आहे. याबाबत विशाल भारद्वाजने सांगितले की, ‘जंगल जंगल बात चली है पता चला है’ हे माझे पहिले यशस्वी गाणे आहेच, शिवाय गुलजार साहेबांसोबत काम करण्याची देखील पहिलीच संधी होती. जेव्हा आम्ही हे गाणे तयार करीत होतो, तेव्हा त्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली, तेव्हा आम्ही काय करत आहोच, याचा आम्हाला अजिबात अंदाज नव्हता. त्यातच २३ वर्षांनंतर पुन्हा आम्हाला याच गाण्यावर काम करावे लागत असल्याने मी उत्साही असल्याचे त्यांनी सांगितले.