इतिहासातील महान प्रेमवीरांच्या व्हॅलेंटाईन टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:59 IST
इतिहास हिंसक आठवणी आणि प्रसंगांनी भरलेला असतो. क्वचितच प्रेमाचे फुल त्यात उमलते.
इतिहासातील महान प्रेमवीरांच्या व्हॅलेंटाईन टिप्स
सामान्यत: इतिहास हिंसक आठवणी आणि प्रसंगांनी भरलेला असतो. क्वचितच प्रेमाचे फुल त्यात उमलते. व्यक्ती कोणीही असो, प्रेमाचा स्पर्श त्याला झाला नाही असे होतच नाही. मग त्याला इतिहास घडविणारे महान पुरुष तरी कसे अपवाद ठरतील? चला तर मग व्हॅलेंटाईन सप्ताहाच्या निमित्ताने जाणून घेऊया ऐतिहासिक पुरुषांकडून ‘लव्ह टिप्स’. नेपोलियन बोनापार्टयुरोपावर अधिराज्य गाजविण्याची महत्त्वकांक्षा बाळगून जगणारा नेपोलियन न केवळ युद्धनीतीमध्ये पारंगत होता तर तो प्रेमातही तेवढाच कुशल होता. त्याची पत्नी जोसेफिनला तो पत्र लिहून त्यांच्या भावना व्यक्त करत असे - ‘भविष्यात माझ्यासाठी काय लिहून ठेवले हे मला माहित नाही; पण तुझ्याशी असलेला हा दुरावा मला असहाय्य आहे.’ व्हॅट्सअॅप चॅटिंगच्या युगात पत्र लिहून प्रेयसीला इम्प्रेस करण्याची आयडिया चांगली आहे. शहाजहाँपे्रमाचे सर्वोत्तम प्रतीक ‘ताजमहाल’चा निर्माता मुघल सम्राट शहाजहाँ इतिहासातील सर्वात रोमँटिक व्यक्ती असेल. त्याची राणी ‘मुमताज’च्या प्रेमात आकांत बुडालेल्या शहाजहाँने ताजमहाल बांधून अजरामर प्रेमाचे एक उदाहरणच जगा समोर ठेवले आहे. तुम्ही जरी ताजमहाल बांधू शकत नसले तरीही प्रेयसीसाठी अधूनमधून काही तरी गँ्रड गोष्टी करण्याची तुमची तयारी असली पाहिजे जी आयुष्यभर तिच्या लक्षात राहिल. कॅसानोव्हा‘कॅसानोव्हा’ हे नाव जरी बदनाम असले तरी प्रेमाच्याबाबतीत अनेक मौल्यवान गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहे. तो म्हणतो की, शारीरिक आनंदापलिकडे महिलांचा आदर करायला हवा. केवळ लग्न झाले म्हणून रोमान्स, प्रेमयाचना करण्याची गरज नाही असे नाही. महिलांच्या केवळ शारीरिक गुणवैशिष्ट्यांना महत्त्व देऊ नका. त्यांच्या बुद्धमत्तेलाही वाव द्या आणि प्रेमाच्या आणाभाक करण्यापेक्षा कृतीतून ते करून दाखवा. क्लायड (अँड बॉनी)क्लायड हे नाव बॉनीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. दोघेही एक नंबरचे चोर. गेल्या शतकाच्या सुरुवातीला या चोर द्वयीने अमेरिकेत चांगलाच धुमाकूळ घातला होता. एकमेकांपासून कधीही वेगळे न होऊ शकणाºया बॉनी आणि क्लायडने एकत्रच शेवटचा श्वास घेतला. त्यांच्यासारख्या चोºया/गुन्हे नाही तर सदैव एकमेकांच्यासोबत राहण्याची, एकमेकांची साथ देण्याची शिकवण आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. जो डिमॅजिओहॉलिवूडची सौंदर्यसाम्राज्ञी मर्लिन मुनरो आणि तिचा दुसरा पती जो डिमॅजिओ यांचा संसार जरी जास्त दिवस टिकू शकला नसला तरी ते एकमेकांचे नेहमीच जिवलग मित्र राहिले. मर्लिनच्या आत्महत्येनंतर तिच्या घरात सापडलेल्या शेवटच्या पत्रात तिने लिहिले होते की, जो तुझे सुख म्हणजेच माझे सुख. आपली प्रेयसी आपली सर्वात जवळची मैत्रिणदेखील हवी. प्रेम आणि मैत्री एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.