शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

आॅफिसला जाताना सिम्पल, सोबर आणि सुंदर दिसायचंय मग कार्पोरेट कुर्तीज घाला!

By admin | Updated: June 27, 2017 18:52 IST

फॅशनच्या जगात कॉर्पोरेट वेअर, कॉर्पोरेट कुर्तीज असं एक नवं सेगमेंट नव्यानं आपली जागा निर्माण करत आहे.

 

- मोहिनी घारपुरे - देशमुख

हल्ली सगळीकडेच कॉर्पोरेट कल्चरची चलतीआणि  आहे. जात, धर्म यांपलिकडे जाऊन ग्लोबल मार्केटमध्ये कॉम्पिटिटीव्ह राहण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या बाबीवर हे कल्चर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. बुद्धीमत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास हे या कॉर्पोरेट कल्चरचं बेसिक सूत्र आहे. त्यामुळेच एकंदरीतच कॉर्पोरेटचा भाग असणाऱ्या मुलामुलींनी आपल्या पेहेरावावर विशेष लक्ष द्यावं असं फॅशन जग सांगतं. आणि म्हणूनच फॅशनच्या या जगात कॉर्पोरेट वेअर, कॉर्पोरेट कुर्तीज असं एक नवं सेगमेंट नव्यानं आपली जागा निर्माण करत आहे.

 

अशा असतात कॉर्पोरेट कुर्तीज

एरवी खरंतर लो नेक, आॅफ शोल्डर, बॅकलेस कुर्तीज आणि सलवार सूट्सलाच तरूणींची पसंती असते मात्र आॅफीसला जाताना स्मार्ट आणि टॅलेण्टेड दिसण्यासाठी पोषाखही तसाच आकर्षक असावा यासाठी कॉर्पोरेट लुक कॅरी करण्यास तरूणी प्राधान्य देतात. यामध्ये विशेषत: स्टॅण्ड कॉलर, थ्रीफोर्थ स्लीव्ह्स, फ्रंट बटन्स, सिंपल रिच फॅब्रिक अशा प्रकारच्या पोषाखाला प्राधान्य दिलं जातं. गडद रंगांपेक्षाही सिंपल सोबर रंगांची निवड हमखास केली जाते. तसंच खादीच्या कपड्यांनाही प्राधान्य दिलं जातं किंवा अगदी अधेमधे मरून, डार्क ब्ल्यू, सिल्व्हर वगैरे रंगांचे कपडे एस्थेटीक सेन्स वापरून वापरले तरीही छान दिसतात.

जीन्स नको ट्राऊझर हवी

कशीही वापरली तरीही चालणारी जीन्स आॅफीसला जाताना मात्र वापरल्यास अगदीच कॅज्युअल लुक येऊ शकतो. कॉर्पोरेट लुक कॅरी करायचा असेल तर बाजारात अनेक प्रकारच्या ट्राऊझर्स उपलब्ध आहेत त्यांपैकी कोणतीही योग्य त्या मापातली आणि योग्य त्या फिटींगचीच ट्राऊझर वापरा. काळ्या, पांढर्या, निळ्या, राखाडी आणि मिल्ट्री ग्रीन कलरच्या ट्राऊझर्स शोभून दिसतात.

 

       

एवढं लक्षात ठेवाच!

*आॅफीसमध्ये अन्य सहकाऱ्यांचं लक्ष विचलित होईल असे कोणतेही कपडे घालूच नका. तसंच बांगड्या, मोठे मोठे कानातले, घुंगरू लावलेल्या ओढण्या किंवा कानातले वगैरे तर अजिबातच नकोत. त्यामुळे कामात लक्ष लागत नाहीच तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वातील बुद्धीपेक्षा सौंदर्यालाच अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही

* आॅफिसमध्ये जाताना खूप आवाज करणाऱ्या चपला, बूट, सॅण्डल्स घालणंही टाळा.

*फार डीप नेक, स्लीव्हलेस कपडे वगैरे घालणं शक्यतो टाळा, त्याऐवजी स्टॅण्ड कॉलर, हाय नेक किंवा सिंपल सोबर कपडे घाला.