गौतमला राग येतोय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:46 IST
शांत डोहाखाली मोठी खळबळ सुरू असते असं म्हणतात. होय, भारतीय क्रिकेट संघाचा फटके...
गौतमला राग येतोय !
शांत डोहाखाली मोठी खळबळ सुरू असते असं म्हणतात. होय, भारतीय क्रिकेट संघाचा फटकेबाज खेळाडू, सलामीला येऊन प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे आक्रमण मोडताना चेंडूला दाहीदिशा फिरविणारा तरीही एक शांत व गुणी खेळाडू म्हणून गौतम गंभीर परिचित आहे. मात्र संघातून वगळले गेल्यानंतर गेल्या काही दिवसांत गौतम रणजी सामन्यात खेळताना ताळतंत्र सोडून प्रतिस्पर्धी खेळाडूंशी मैदानावर भांडताना दिसतोय.नुकतेच गौतमच्या संघाची कोलकत्यात बंगालशी लढत झाली तेव्हा गौतम व मनोज तिवारीची मैदानातच हमरीतुमरी झाली. गंभीरला सध्या वारंवार राग का येतोय? याचे कारण इतर कुणापेक्षा त्याची पत्नी नताशाला माहीत असावे. म्हणून संपर्क केला तर तिने याबाबत मौन पाळणेच पसंत केले. आता केवळ गंभीरच हे प्रकरण मैदानावर मिटवेल, असे दिसतेय.