भारतात वाढतेय ‘फूड टूरिझम’ची क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 13:54 IST
६३ टक्के भारतीय पर्यटक पुढील वर्षी केवळ विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटणाला जाणार आहेत.
भारतात वाढतेय ‘फूड टूरिझम’ची क्रेझ
भारतीय लोक खाण्याचे शौकिन म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. बाहेर फिरायला जरी जायचे झाले तर कुठे कसे जेवण मिळते यावरूनच ‘ट्रिप’ प्लॅन केली जाते. एका आॅनलाईन ट्रॅव्हल पोर्टलने केलेल्या सर्वेक्षणातून देसी ‘ट्रॅव्हलर्स’ची ‘फूडी’ म्हणून ओळख समोर आली आहे.सर्व्हेनुसार ६३ टक्के भारतीय पर्यटक पुढील वर्षी केवळ विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटणाला जाणार आहेत. म्हणजे आपली ‘खवय्येगिरी’ची भूक शमवण्यासाठी भारतीय पर्यटक घराबाहेर पडणार आहेत. ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे खाण्यासाठी काय प्रसिद्ध आहे यावरून ५१ टक्के भारतीय पर्यकट तेथे जायचे की नाही हे ठरवतात.हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जाण्याचे प्रमाण देशामध्ये वाढत असून जागतिक दर्जाचे ‘फूड कल्चर’ विकसित होत आहे. बाहेर जेवताना भारतीय स्वदेशी डिशेसला सर्वोच्च प्राधान्य देतात. त्यानंतर इटालियन खाद्यपदार्थांचा क्रमांक लागतो. सुमारे ३४ टक्के लोक महिन्यातून एक-दोन वेळेस तर ३३ टक्के लोक आठवड्यातून एकदा बाहेर जेवण करतात. हॉटेल्सची वाढती संख्या आणि खाण्याविषयीचे निस्सिम प्रेम या गोष्टींमुळे भारतात फूड ट्रव्हेलिंगची क्रेझ पसरत आहे. सर्व्हेमध्ये ६७ लोकांनी एका निश्चित रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा बेत आखत असल्याचे सांगितले. ३५ टक्के लोकांनी सेलिब्रेटी शेफसाठी एखाद्या हॉटेलला भेट दिल्याचे मान्य केले. रेस्टॉरंटची निवड करताना ५७ टक्के लोक आॅनलाईन रिव्ह्युवझ् तपासून पाहतात. मग तुमचा काय प्लॅन आहे? राजस्थानी थाली की, गुजराती ढोकळ की, बंगालचा रसगुल्ला की, हैदराबादची बिर्याणी? आम्हाला सांगा ‘सीएनएक्समस्ती’च्या संकेतस्थळावर.