शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कमी जागेतही फुलवा सुंदर बाग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 15:55 IST

आपल्या घराच्या अवतीभोवती सुंदर बाग असावी असे बहुतेक लोकांना वाटते, मात्र जागेअभावी किंवा वेळेअभावी काहीच करू शकत नाही.

-रवींद्र मोरे आपल्या घराच्या अवतीभोवती सुंदर बाग असावी असे बहुतेक लोकांना वाटते, मात्र जागेअभावी किंवा वेळेअभावी काहीच करू शकत नाही. पण व्यस्त लाईफमधून थोडा वेळ काढून तसेच क्रिएटिव्ह माइंड वापरून कमी जागेत का होईना, आपण अगदी कमी जागेतही स्वप्नातली सुंदर बाग फुलवू शकतो.* यासाठी काचेच्या जुन्या बशीत थोडंसं पाणी घेऊन गाजर, मुळा, बीट यांच्या पानांकडच्या बाजू कापून थोड्या जाड चकत्या घ्या. बशीतल्या पाण्यात या चकत्या ठेवल्यास देठांना कोंब येतील, कोंब थोडे मोठे झाले म्हणजे या चकत्या डबा किंवा कुंडीतल्या मातीत लावा. आपल्याला गाजर, मुळा, बीट यांचा पाला खायला मिळेल. या पानांची कोशिंबीर बनवून वापरू शकता. * लसूण पाकळयांचा बुडाकडचा भाग अर्ध्या उंचीपर्यंत ओल्या मातीत खोचून ठेवल्यास थोड्या दिवसांनी वरच्या भागातून कोंब येईल आणि पात वाढली म्हणजे लसूण पात घरच्या घरी मिळेल.* बऱ्याचदा मिरच्या कापल्यास खाली बिया पडतात. आपण त्या बिया फेकून देतो. मात्र खाली पडलेल्या बिया एखाद्या मातीच्या डब्यात टाकत राहिल्यास त्याला कोंब फुटून रोपं तयार होतील. मिरची रोपाला लागल्यावर लगेच खुडलीत तर कमी तिखट असेल, उशिरा खुडलीत तर अधिक तिखट मिळेल. जेवढ्या मिरच्यांची खुडणी कराल, तेवढ्या अधिक मिरच्या मिळतील.* फुलपुडीतून येणारी झेंडूची फुलं सुकल्यावर फेकून न देता एका कुंडीत टाका. रुजून कोंब येतील आणि छोटी छोटी झेंडूची फुलं धरतील. मध्यम सूर्यप्रकाशाच्या जागी ही कुंडी छान फुलते.* बाजारातून आणलेला शेवंतीचा गजरा सुकला म्हणजे कुस्करून कुंडीत टाका. पिवळ्या शेवंतीने भरलेली कुंडी घरात ऊन येतं अशा कोपºयात ठेवा म्हणजे ती तुमच्या घरात आनंद फुलवत राहील.झाडांना पाणी घालताना काळजी घ्याझाडांना पाणी जास्त घालू नका. माती ओली ठेवण्यापुरतंच घाला. जर पालेभाज्यांचे देठ, चहाचा चोथा असं वापरत असलात तर पाणी फारसे घालण्याची गरज नाही. घरात खूप झाडं झाली म्हणजे भांडी घासायच्या आधी साबण न लावता भांडी विसळून घ्या आणि ते पाणी झाडांना थोडं थोडं घाला. वेगळं पाणी वापरण्यापेक्षा हे पाणी अधिक सकस ठरतं. शिवाय पाण्याची बचतही होईल.