जोडीदाराबरोबरची पहिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 08:53 IST
नव्याने लग्न झाल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराबद्दल माहिती नसते. त्यामुळे अनेकांच्या मनात अगोदर मोठी भिती असते.
जोडीदाराबरोबरची पहिली भेट
तसेच जोडीदाराबद्दलची आपली पहिली भेट कशी राहणार याची उत्सुकताही लागून असते. याकरिता न घाबरुन जाता. दोघांनेही एकमेकांना समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे. आपल्या जोडीदाराला आपण काय करणार याची माहितीही असू द्या. अनेकजण आपल्या जोडीदारापासून काही गोष्टी लपविण्याचे काम करतात. त्यामुळे अशी जोडपी कधीच आनंदीत राहू शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांच्यामध्ये वादही उद्भवत असतात. एकमेकांना समजून घेण्यासाठी सोबत चित्रपट पाहणेही योग्य आहे. चित्रपट पाहण्यासह बाहेर फिरायला जाणे ही एक एकमेकांना समजून घेण्यासाठी उत्तम संधी आहे. तसेच सोबत डिनरला जाणेही आवश्यक आहे. दोघेही रोमाँटिक मूडमध्ये असणे आवश्यक आहे. बाहेर सोबत गेल्यानंतर काही पेयेही सेवण करणे गरजेचे आहे. यामुळे एकमेकांबद्दलचे प्रेम वाढायला लागते. यामुळेच जोडपी नेहमी आनंदीत राहू शकतात.