शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Fashion : ट्रेंडी लूकसाठी ‘टो-रिंग’ची वाढली क्रेझ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 15:27 IST

जोडव्यांमध्ये सध्या टो-रिंग नावाचा प्रकार खूप ट्रेंडी होताना दिसत आहे. जर तुम्हालाही ट्रेंडी दिसणे आवडत असेल तर जोडव्यांच्या या ट्रेंडविषयी जाणून घ्या.

भारतीय परंपरेनुसार लग्नानंतर स्त्रिया पायात जोडवी घालतात. मात्र गेल्या दशकापासून बदलत्या मॉडर्न जीवनशैलीनुसार जोडवी घालण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले होते. कारण राहणीमान फॅशनेबल आणि पायातील जोडवी ही जून्या फॅशनचे, त्यामुळे बहुतेक महिला ते वापरणे टाळायचे.मात्र फार कमी स्त्रियांना हे माहित असेल की या जोडव्यांमध्येही आता नवीन ट्रेंड आला आहे. फॅशन व ट्रेंडच्या या काळात प्रत्येक गोष्ट ट्रेंडी झाली आहे. मग जोडवींना पण डिझायनरांनी वेगळा आणि फॅशनेबल लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नातून जोडव्यांमध्ये सध्या टो-रिंग नावाचा प्रकार खूप ट्रेंडी होताना दिसत आहे. जर तुम्हालाही ट्रेंडी दिसणे आवडत असेल तर टो-रिंग म्हणजे जोडव्यांच्या या ट्रेंडविषयी जाणून घ्या. बहुतांश टीव्ही मालिकांमध्ये लग्नानंतर सासरी येणाऱ्या नववधूच्या पायांत या प्रकारची जोडवी दिसतात. आजकाल प्लास्टिकची नाजूक दिसणारी जोडवी फॅशनमध्ये आहेत. ही जोडवी विविध रंग व डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच रबर, मोती, स्टोनच्या जोडव्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.स्टीलची जोडवी विशेष आकर्षक दिसतात. स्टर्लिंग सिल्व्हर टो-रिंगने तर आंतरराष्ट्रीय बाजारातही स्थान मिळवले आहे. प्लॅटिनमसारख्या व्हाईट मेटलची जोडवी फॉर्मल व कॅज्युअल अशा दोन्ही प्रसंगी घालता येतात.मेटल व विना मेटल अशी दोन्ही प्रकारची जोडवी बाजारात उपलब्ध आहेत. बहुतांश जोडवी पायाच्या दुसऱ्या बोटात घातली जातात. परंतु बदलत्या फॅशनसोबत पायाच्या कुठल्याही बोटात तुम्ही ही घालू शकता.ही जोडवी कोणत्याही ड्रेससोबत घालून मॉडर्न व ट्रेंडी लूक मिळवता येतो. फंकी व कूल प्रकारची जोडवी तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक खुलवतील.