फेसबुकने मागितली ‘लठ्ठ मॉडेल’ माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 20:40 IST
फेसबुकने एका प्लस साईज मॉडेलची जाहिरात प्रकाशित करण्यास नकार दिल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे.
फेसबुकने मागितली ‘लठ्ठ मॉडेल’ माफी
सोशल मीडिया वेबसाईट फेसबुकने एका प्लस साईज मॉडेलची जाहिरात प्रकाशित करण्यास नकार दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्या मॉडेलची जाहीर माफी मागितली आहे.टेस हॉलिडे असे त्या मॉडेलचे नाव आहे. तिने बिकिनी घातलेली जाहिरात केवळ ती लठ्ठ आहे म्हणून फेसबुकवर अपलोड करण्यास कंपनीने मनाई केली होती. यावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर कंपनीने माफी मागितली आहे.जाड व लठ्ठ लोकांप्रती समाजात सकारात्मक संदेश देण्याच्या हेतूने आॅस्ट्रेलियातील स्त्रीवादी संस्था ‘चेरचेझ ला फेमे’ने ही जाहिरात बनविली होती.फेसबुकच्या जाहिरात विभागाने त्यांना मनाई करत सांगितले की, अशा प्रकारची जाहिरात पाहून यूजर्सना वाईट वाटू शकते. याचा स्क्रीनशॉटच संस्थेने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला.कंपनीने यावर खुलासा केला की, आमची यंत्रणा जाहिरातींचे आठवड्यातून लाखो फोाटो तपासते. त्यामुळे एखाद्या वेळी चुक होऊ शकते. कंपनीच्या निदर्शनात आल्यावर लगेच सांगण्यात आले की, ही जाहिरात नियमांत बसते आणि फेसबुकवर अपलोड करण्यास योग्य आहे.‘फेमिनिजम अँउ फॅट’ या कार्यक्रमाच्या सहनिर्मात्या जेसेमी ग्लिसन कंपनीच्या धोरणांवर रोष व्यक्त करताना म्हणाल्या की, सौंदर्याची जी समाजमान्य मापदंड आहेत, अशा फोटोंवर कंपनी कोणतीच कार्यवाही करत नाही. मग केवळ त्या मापदंडात बसत नाही म्हणून लठ्ठ व्यक्तींच्या फोटोंना नकार देणे अत्यंत दुर्दैवी बाब आहे.