अखेर जिम कॉर्बेटची रायफल आली भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 14:10 IST
‘जॉन रिग्बाय अँड को’चे व्यावस्थापकीय संचालक मार्क न्युटन ही रायफल घेऊन भारतात आले आहेत.
अखेर जिम कॉर्बेटची रायफल आली भारतात
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी आणि पूर्वाश्रमीचा शिकारी जिम कॉर्बेटचे नाव आपल्यापैकी प्रत्येकाने शालेय अभ्यासक्रमात एकदा तरी ऐकले असेल. विसाव्या शतकाच्या सुरुवातील जिम भारतामध्ये राहत असे. छोटी हल्दवानी नावाचे गाव त्यानेच वसवले आहे.शिकारीसाठी तो वापरत असलेली रायफल अखेर या मुळ गाव परत आली आहे. लंडनस्थित पुरातन बंदुकीची एक्सपर्ट कंपनी ‘जॉन रिग्बाय अँड को’चे व्यावस्थापकीय संचालक मार्क न्युटन ही रायफल घेऊन भारतात आले आहेत.1907 साली कार्बेटने 436 माणसांच्या मृत्यूला जबाबदार वाघ ‘मॅन-ईटर आॅफ चंपावत’ची शिकार केल्यानंतर सर जे. पी. हेवेट यांनी त्याला ही 0.245 कॅलिबर रायफल भेट म्हणून दिली होती. असे म्हणतात की, कार्बेटची ही सर्वात प्रिय रायफल होती आणि त्याने एका पत्रात लिहिले आहे की अनेक वेळा या बंदुकीमुळे त्याचे प्राण वाचले आहेत. Man Eater of Champawatकॉर्बेट टायगर रिझर्व्हचे (सीटीआर) संचालक समीर सिन्हा यांनी माहिती दिली की, आम्ही गेली एक वर्ष ही रायफल भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होतो. आम्ही मार्क न्युटन यांचे आभारी आहोत की, जिम कॉर्बेटच्या कर्मभूमीत ते ही रायफल घेऊन आलेत. कॉर्बेट टायगर रिझर्व्ह येथे दहा दिवसीय प्रदर्शनात ही रायफल ठेवण्यात येणार आहे.