शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

पाकिस्तानातल्या एका इंजिनिअर मुलानं रोबेटिक वेट्रेस बनवली आणि आपल्या वडिलांच्याच पिझ्झा रेस्टॉरण्टमध्ये तिला नोकरीही दिली!

By admin | Updated: July 12, 2017 17:41 IST

पाकिस्तनातील मुलतान शहरातील एका पिझ्झा रेस्टॉरंट मध्ये रोबोट वेट्रेस आहे तिला पाहण्यासाठी तीन सर्व्ह केलेला पिझ्झा खाण्यासाठी गर्दी लोटत

- माधुरी पेठकर एखाद्या पिझ्झा रेस्टॉरण्टमध्ये गर्दी का होते? असा प्रश्न विचारला तर लगेच उत्तर मिळेल. ‘सोपं आहे , तिथला पिझ्झा चवीला एकदम बेस्ट असेल म्हणून तिथे गर्दी असेल!’पण हे उत्तर इतर कोणत्याही रेस्टॉरण्टसाठी असतं तर बरोबर ठरलं असतं. पण पाकिस्तानातील मुलतान शहरातील ‘पिझ्झा डॉट कॉम’ या रेस्टॉरण्टसाठी म्हणाल तर उत्तर चुकीचं आहे. कारण इथे लोकं नुसते जेवणासाठी किंवा पिझ्झा खाण्यासाठीच येतात असं नाही तर या रेस्टॉरण्टमधील वेट्रेस बघण्यासाठी, त्यांनी  सर्व्ह केलेला पिझ्झा खाण्यासाठी मुलतान शहरातूनच नाही तर आजूबाजूच्या शहरातूनही लोक आवर्जून येतात. तासनतास रेस्टॉरण्टच्या बाहेर रांगा लावून आपला नंबर येण्याची वाट पाहात राहतात. आता या वेट्रेसमध्ये एवढं काय आहे? असं विचाराल तर या वेटे्रस मानवी नसून रोबोट आहेत. या रोबोट वेट्रेसपिझ्झाची आॅर्डर त्या त्या टेबलवर बिनचूकपणे पोहोचवतात आणि परत आपल्या जागेवर जावून उभ्या राहतात. म्हणून हा सगळा कौतुकाचा आणि कुतुहलाचा विषय.

 

सय्यद अझिझ अहेमद जाफरी हे त्या पिझ्झा डॉट कॉम रेस्टॉरण्टचे मालक. त्यांच्या मुलानं म्हणजे सय्यद ओसामा अझिझ यानं हे या रोबेटिक वेट्रेस बनवल्या. इस्लामाबादमधील कॉलेजमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरची पदवी मिळवलेला हा तरूण. त्याने नेटवरून चीनमध्ये याबाबत झालेला प्रयोग वाचला अभ्यासला. आणि अभ्यासक्रमातला एक प्रकल्प म्हणून त्यानं रोबेटिक वेट्रेस बनवून पाहिली. कॉलेजमध्येही त्याचा हा प्रकल्प वाखाणला गेला. नंतर त्यानं आपल्या वडिलांकडे आपल्या रेस्टॉरण्टमध्येही रोबेटिक वेट्रेस ठेवल्या तर आपल्या रेस्टॉरण्टची कमाई दुप्पट होईल. वडिलांना ओसामाची ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी अमलातही आणली. आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच झाले. पिझ्झा खाण्यासोबतच या रोबेटिक वेट्रेस घण्यासाठी रेस्टॉरण्टमध्ये गर्दी वाढू लागली. 

आता तर सय्यद अझिझ अहेमद जाफरी हे मुलतान शहरात आणखी एक रेस्टॉरण्ट उघडून तिथे तीन ते चार रोबेटिक वेट्रेस र्व्हिंगसाठी ठेवणार आहेत. 

ओसामानं बनवलेल्या या रोबेटिक वेटे्रसचं वजन 25 किलो असून ती 5 किलो वजनाच्या फूड आॅर्डर सर्व्ह करू शकते. ही रोबेटिक वेटे्रस तिच्या मार्गात आलेल्या अडथळ्यांना ओळखू शकते आणि ‘मला पुढे जायला जागा द्या’ अशी विनंती करून पुढेही जावू शकते. या रोबेटिक वेटे्रसमधला युनिक सर्व्हर हा मेटलचा असून डोक्याखालचा पूर्ण भाग ह फायबरग्लासचा बनवला आहे. आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स साधनं तिला लावण्यात आली आहे.

 

 

 

ही रोबोट वेट्रेस पिझ्झा आॅर्डर त्या त्या टेबलवर सर्व्ह करू शकते. मात्र ती आॅर्डर घेवू शकत नाही. पुढे जावून तिच्यात ही सुधारणा करण्याची ओसामाची इच्छा आहे. ओसामानं रोबोट वेट्रेसच का बनवली? हा प्रश्न जो तो विचारतो आहे पण यामागचं कारण तांत्रिक असल्याचं ओसामाचं म्हणणं आहे. रोबोटचं शरीर स्त्री शरीर ठेवल्यानं मशीनला वजन बॅलन्स करायला सोपं जातं. ओसामानं रोबोट वेट्रेस आहे हे दाखवण्यासाठी तिला पेहराव तसाच दिला असून तिच्या गळ्यात स्कार्फही घातला आहे. सध्या तर लहान मुलंच नाही तर मोठी माणसंही ही रोबोट वेट्रेसत्यांच्या टेबलजवळ सर्व्हिंगसाठी आली की तिच्यासोबत सेल्फी काढून इतरांना फॉरवर्ड करण्याची हौस भागवता आहेत.