एलिझाबेथला वाटायचे रक्ताचे भय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:05 IST
एलिझाबेथ होम्स ही जगातील सगळ्यात तरुण व स्वकर्तृत्वाने झालेली कोट्याधिश आहे.
एलिझाबेथला वाटायचे रक्ताचे भय
एलिझाबेथ होम्स ही जगातील सगळ्यात तरुण व स्वकर्तृत्वाने झालेली कोट्याधिश आहे. रक्त तपासणीच्या क्षेत्रात तिने स्वत:चे नाव उंचावलेले आहे. पण तिला स्वत:लाच रक्ताचे भय वाटते.एलिझाबेथ होम्स ही ३१ वर्ष तरुणी थेरानॉस या रक्त तपासणी कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तिला रक्ताच्या भयातून प्रेरणा मिळाली. सीएनबीसीच्या स्कॉक बॉक्स या वृत्तविषयक कार्यक्रमात तिने सांगितले की, तिला असणारे रक्ताचे भय आणि आजारपणामुळे कुटुंबातील सदस्य गमाविल्यानंतर तिला रक्ततपासणी विषयक कंपनी सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.थेरानसची फिंगर प्रिक तपासणीसाठी फक्त एक थेंब रक्त लागते. ज्यातून काही रोगांचे निदान तर होतेच शिवाय रक्त तपासणीही होते. गेल्या जुलै महिन्यात कंपनीला एफडीएचची पहिल्या तपासणीसाठी मान्यताही मिळाली. नंतर एफडीएने पूर्ण मान्यता दिली. ही परवानगी प्रयोगशाळेच्या बाहेरील रक्त तपासणीसाठी सुद्धा आहे. थेरानस सध्या विविध औषध निर्माण कंपन्या मुख्यत: वॉलग्रिन्ससोबत संपूर्ण अमेरिकेत रक्त तपासणीचा उपक्रम राबवित आहे. या माध्यमातून रुग्णांना पटकन रक्त तपासणी करता येते.