निसर्गप्रेमींसाठी ईकोकॅप्सूल घरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:06 IST
गेल्या महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या वातावरण बदल परिषदेमध्ये ग्लोबल वॉर्मिंगवर बराच उहापोह झाला.
निसर्गप्रेमींसाठी ईकोकॅप्सूल घरे
गेल्या महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या वातावरण बदल परिषदेमध्ये ग्लोबल वॉर्मिंगवर बराच उहापोह झाला. निसर्गाचे ढासळते संतुलन, वाढते प्रदूषण यामुळे आगामी काळात आपली पृथ्वी मानवाच्या राहण्यासाठी धोकादायक बनेल यावर चिंता व्यक्त केली गेली. असे भयावह भविष्य टाळायचे असेल तर आतापासूनच अनेक गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. त्यादृष्टीने एक पाऊल म्हणून इकोफ्रेंडली घरे तयार करण्यात आली आहेत.ईकोकॅप्सुल नावाचे अंड्याच्या अकाराचे हे फिरते घर (मोबाईल होम) ८६ हजार डॉलर किमतीचे असून अशा प्रकारची केवळ ५0 घरे बनविण्यात आलेली आहेत. पर्यावरणाला पुरक अशी ही घरे तुम्ही प्री-ऑर्डर बुक करू शकता. नाईस आर्किटेक्ट्स या कंपनीने विकसित केलेले 'ईकोकॅप्सुल' संपूर्णपणे सौरऊर्जा आणि पवनऊज्रेवर चालते. २७ चौ. फुट क्षेत्रफळाचे हे घर दोन जणांसाठी पुरेसे आहे. यामध्ये बाथरूम, वॉटरलेस टॉयलेट, दोन बर्नर आणि सिंकसह छोटेखानी किचन, डबल बेडमध्ये रुपांतरित करण्याजोगा सोफा अशा अनेक सुखसुविधा मिळतात. या वर्षाच्या शेवटपर्यंत या घरांची तुम्हाला डिलिव्हरी मिळू शकते.