उत्तम स्वास्थ्यासाठी प्या थंड दूध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:20 IST
घरात अनेकांना थंड दूध प्यायला सांगितले की लगेचच ते तोंड मुरडतात. थंड दुधासाठी कधीही नकारघंटाच वाजवली जाते. पण थंड दुधाचे फायदे जर कळाले तर तुम्ही स्वत:हूनच ते प्याल.
उत्तम स्वास्थ्यासाठी प्या थंड दूध!
थंड दूध पिल्याने अँसिडीटी, स्थूलता, वारंवार भूक लागणे तसेच लहान-मोठे आजार दूर होतात.जसे व्यक्तीला पोटभर जेवण आवश्यक असते त्याचप्रमाणे त्याला व्यायामही आवश्यक असतो. त्यामुळे अनेक जण योगा, जीम, व्यायाम करत असतात. त्यामुळे जीमवरून तुम्ही आलात की, लगेचच काहीतरी खायला मागत असता. अशावेळी तुम्ही ओट्स आणि थंड दूध जर एक क टोरा भरून जर खाल्ले तर तुम्हाला फ्रेश वाटेल. स्नायूंना रिपेयर होण्यासाठी प्रोटीनची गरज असते.दुधाचा कंटाळा : नुसते दूध पिण्याचा प्रत्येकाला कंटाळाच येतो. पण जर थंड दूधात फ्लेव्हर मिसळला तर जास्त टेस्टी लागू शकते. नेहमीचे जे आजार जसे सर्दी-ताप असतात ते लवकर बरे होतात. थंड दुधामुळे एनज्रेटिक वाटते आणि भूक लागत नाही. परिणामी वजन कमी होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही.