कर लो तारे मुठ्ठी में...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 05:10 IST
विजेते जिथे आॅस्कर ट्रॉफीसोबत फोटो काढत होते तेथे मॅट त्याच्या मनगटावर असणाऱ्या घडीसह पोझ देत होता. असं काय आहे या घडीमध्ये?
कर लो तारे मुठ्ठी में...
मागचया रविवारी पार पडलेला नेत्रदीपक आॅस्कर सोहळा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला. डिकॅप्रियोच्या पहिल्या आॅस्करपासून ते प्रियंका चोपडाची उपस्थितीपर्यंत मागचा संपूर्ण आठवडा आॅस्कर ट्रेंडिंग होता.रेडकार्पेटवर सर्व लावण्यवतींनी घातलेली कोटी कोटींचे दागिणे आणि ड्रेसेसबरोरबच ‘मार्शियन’ अॅक्टर मॅट डेमनची घडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळूनही मॅटला रिकामी हातीच परतावे लागले. विजेते जिथे आॅस्कर ट्रॉफीसोबत फोटो काढत होते तेथे मॅट त्याच्या मनगटावर असणाऱ्या ‘मिडनाईट प्लॅनेटरियम’ घडीसह पोझ देत होता. असं काय आहे या घडीमध्ये? ‘व्हॅन क्लिफ अँड आर्पल्स’ कंपनीच्या या घडीमध्ये आपली अर्धे सौरमंडळ सामावलेले आहे. दचकलात? अहो, या घडीमध्ये ग्रहमालेतील पाच ग्रहांची सुर्याभोवती होणारी परिक्रम दर्शवणारे त्रिमितीय (3-डी) सूक्ष्म मॉडेल इन्स्टॉल करण्यात आले आहे.पृथ्वीवरून नजरेस पडणारे बुध, शुक्र, मंगळ, शनी आणि गुरू ग्रहांचे भ्रमण दर्शविण्यात आले आहे. घडीच्या मधोमध सोनेरी गुलाबी रंगात सुर्य असून त्याभोवती रिअल टाईममध्ये फिरणारे ग्रह विविध रंगाच्या खड्यांपासून तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे बुध ग्रह केवळ ८८ दिवसांत तर शनीला एका संपूर्ण फेरा मारण्यासाठी २९ वर्षे लागतात. काट्यांऐवजी शुटिंग स्टारद्वारे वेळ दर्शविली जाते. एवढेच नाही तर तुमच्यासाठी ‘लकी स्टार’ देखील या घडीमध्ये कोरण्यात आलेला आहे.मग बांधायचे का सगळे ग्रह आपल्या मनगटांवर?