शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचे प्रदर्शन नको !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 15:53 IST

तारुण्य आले की, प्रेमभावना मनात उमलते.

  -Ravindra More             तारुण्य आले की, प्रेमभावना मनात उमलते. म्हणतात की ‘प्रेम’ ही निसर्गाची देणगी आहे. इतिहास पाहिला तर प्रेमाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, कारण बऱ्याच ऐतिहासिक घटना ह्या प्रेमामुळेच घडलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या घटना अजूनही कोणी विसरू शकले नाही. पण बऱ्याचदा प्रेमभावनेचे एवढे प्रदर्शन केले जाते की, त्याचा सामान्य जनतेवर परिणाम जाणवतात. आजच्या सदरात खरी प्रेमभावना काय असते आणि त्याला कसे जपावे याबाबत जाणून घेऊया...बºयाचदा दोघांचे एकमेकांवर खरे प्रेम असूनही काही कारणाने एकमेकांशी भांडता, त्यावेळी आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत की नाही हे भानदेखील विसरतो. मात्र असे न करता सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला सभ्य लोकांसारखंच वागता आलं पाहिजे; किंबहुना तुम्ही सभ्यच वागले पाहिजे. आपण जे काही करतो, बोलतो त्याचा इतरांवर वाईट परिणाम तर होणार नाही ना, याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. भांडण तर सोडाच पण आपण बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रेमाचे असभ्य प्रदर्शन इतरांना घडवितो. शहरात रस्त्यारस्त्यावर आपण हातात हात घालून जोडीने फिरत असतो. परदेशी युवक-युवती तर खुलेआम अशा पद्धतीने फिरतच असतात; पण आपणही त्यांचे अंधानुकरण करीत त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवीत असभ्यतेचे धडे गिरवित असतो. इतरांनी बागांमध्ये जाऊन पाहिले तर त्यांना अशी काही दृश्ये पाहायला मिळतील, की त्यांना पैसे घालवून सिनेमा पाहण्याची गरजच पडणार नाही.   संस्कृतीचा विचार केला तर खरचं ही भारतीय संस्कृती आहे का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर सध्याचे चित्रपट व मालिका आहेत. आज या माध्यमातून दृश्ये ज्या पद्धतीने दाखविली जातात, त्याचा परिणाम आजच्या युवा पिढीवर होतोय. पुष्कळदा आपण मोबाईलवर बोलणारी जोडपी पाहातो. एकमेकांशी बोलणं, गप्पा मारणं यात गैर काहीच नाही. मात्र आज आपण जेवढा वेळ प्रेम गप्पा मारण्यासाठी देतो, तेवढा वेळ खरच कुटुंबासाठीही देतो का? याचा विचार व्हायला नको का? कारण एकत्र कुटुंब पद्धतीत अशा असभ्य घटनांना नक्कीच आळा बसतो.   आपण कसे वागत आहोत, याचा विचार आजच्या तरुणाईने नक्कीच करायला हवा. आपल्या बोलण्याचा, वागण्याचा समाजावर, कुटुंबावर काही विपरित परिणाम होत तर नाहीना याची काळजी नक्कीच घेतली गेली पाहिजे. पूर्वी लोक आपल्या वागण्यामुळं आपल्या कुटुंबावर, आपण राहतो त्या समाजावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काळजी घ्यायचे. पण आज असा विचार होताना दिसत नाही, हे खेदानं म्हणावं लागेल. आपण आपली भारतीय राहणीमान विसरुन पाश्चिमात्यांसारखे कपडे, त्यांची राहणीमान अंगीकारत आहोत. मात्र हे करीत असताना आपले वर्तन, विचार, संस्कार हे बदलणार नाहीत याचीही काळजी आजच्या तरुणाईने घेतली पाहिजे. मालिका, सिनेमामधून दाखविली जाणारी बीभत्स दृश्ये, प्रेमाचे हिडीस सादरीकरण, भावनांचा अतिरेक, कपड्यांचा तोकडेपणा हे सारं त्या-त्या माध्यमात ठीक वाटतं. पण खऱ्या आयुष्यात या सर्वांचं हिडीस प्रदर्शन, असभ्य वर्तन अशोभनीय ठरतं. शिवाय इतरांच्या मनावरही वाईट परिणाम करणारं ठरतं. म्हणूनच युवा पिढीनं, विशेष करून नवविवाहित जोडप्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. तारतम्य ठेवूनच समाजात, कुटुंबात वावरलं पाहिजे. असं वागणं तुमच्या आणि समाजाच्याही हिताचं ठरेल.