शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

दिवाळीत अशी करा गृहसजावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 16:28 IST

दिवाळी म्हटली म्हणजे डोळ्यासमोर दिव्यांची झगमगाट आणि कानात फटाक्यांचा आवाज ऐकायला येतो. या आनंदाच्या प्रसंगी आपल्या घराची सजावट करून एक वेगळा लूक देण्यासाठी सर्वांची धडपड असते. ही सजावट पारंपरिक असण्यासोबतच आगळीवेगळी आणि हटके असायला हवी असे प्रत्येकालाच वाटते. आजच्या सदरात आपण आकर्षक गृहसजावट कशी करावी याबाबत जाणून घेऊया...

-Ravindra Moreदिवाळी म्हटली म्हणजे डोळ्यासमोर दिव्यांची झगमगाट आणि कानात फटाक्यांचा आवाज ऐकायला येतो. या आनंदाच्या प्रसंगी आपल्या घराची सजावट करून एक वेगळा लूक देण्यासाठी सर्वांची धडपड असते. ही सजावट पारंपरिक असण्यासोबतच आगळीवेगळी आणि हटके असायला हवी असे प्रत्येकालाच वाटते. आजच्या सदरात आपण आकर्षक गृहसजावट कशी करावी याबाबत जाणून घेऊया...  दिवाळी हा पाच दिवसांचा उत्सव आहे, जो धनत्रयोदशीपासून सुरू होतो. याप्रसंगी घरात पाहुणेदेखील भरपूर येतात.  त्यांच्या स्वागतासाठी घराची सजावट जर आकर्षक नसेल तर अपूर्णता जाणवेल. यासाठी खालील माहितीच्या आधारे आपण आपल्या घराची सजावट चांगली व आकर्षक करु शकता.भिंतीचा लूक बदलाजर आपणास घराला रंगकाम करण्यासाठी वेळ मिळाला नसेल तर काही हरकत नाही, दिवाळीनंतरदेखील ते काम करु शकता. मात्र, घराची साफसफाई चांगल्या पद्धतीने करा. यासाठी आपण व्हॅक्यूम क्लिनरची मदत घेऊ शकता. तसेच घराच्या फरशीला वेगळा लूक देण्यासाठी आपण कार्पेटचा वापर करु शकता, सोबतच भिंतीवर काही प्रमाणात नवी पेंटींग करुन वेगळा आणि चमकदार लूक देता येतो.फर्निचरला करा रि अरेंजघरातील फर्निचरमुळे घराला घरपण येत असते, मात्र ते कायम एकाच ठिकाणी पाहून पाहणाºयाला नवेपण वाटत नाही आणि त्याच्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. त्याला नवा लूक देण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने रि-अरेंज करा ज्यामुळे आपल्या ड्रॉइंग रुमला एक वेगळेच नवेपण येईल. तसेच सोफ्यांचे कव्हर जर बदलायचे नसतील तर कुशन कव्हर बदला यामुळे देखील आपल्या घरात नवा बदल दिसेल. इनडोअर प्लांट्सइनडोअर प्लांट्सचे एक-एक पान ओल्या फडक्याने साफ करा. त्यांच्या कुंड्या जुन्या आणि फुटलेल्या असतील तर बदला. आपण त्यांच्यावर पेंट देखील करु शकता. दिवाळीच्या काळात ड्रॉइंग रुममध्ये प्लांट्स डेकोरेट केल्याने घराला एक वेगळाच लूक मिळतो. याशिवाय आपण ड्रॉइंग रुममध्ये एका पसरट भांड्यात पाणी भरुन त्यात सुगंधित फुलांच्या पाकळ्या टाकू शकता. रात्री त्यात फ्लोटिंग कॅँडल लावा. यामुळे घराच्या सजावटीत नक्कीच आकर्षकता येईल. खालील टिप्स वापरून आपण घराला आकर्षक रुप देऊ शकता* सर्वप्रथम आपल्या घरातील देवालयाला सुंदर लायटिंगने सजवा.* सोबतच पूजेचे ताटदेखील सुंदर सजवा.* दिवाळीच्या दिवशी अशोकाची पाने आणि झेंडूच्या फुलांची माळ तयार करुन घराच्या सर्व दरवाज्यांना लावा.* दरवाज्यांवर आणि घराच्या मध्यभागी सुंदर रांगोळी काढा. रंग उपलब्ध नसतील तर फुलांचा वापर करा.* रंगीबेरंगी कंदील बाल्कनी किंवा कमी प्रकाशाच्या ठिकाणी लावा.* घराबाहेरील बगिच्यातील झाडे आणि फुलझाडांच्या कुंड्यांवर आकर्षक लायटिंगची रोषणाई करा.* सेंटर टेबलच्या मधोमध काचेचे बाऊल ठेवा, त्यात पाणी भरुन गुलाबाच्या पाकळ्या टाका.* घराच्या मेनगेटवर लक्ष्मीजींचे पाऊल रंगाने बनवा.* घरात कोणत्याही भागात अंधार नको, प्रत्येक ठिकाणी उजेड ठेवा.* उजेडासाठी मेणबत्त्यासोबतच मातीच्या पणत्यांचीही अवश्य वापर करावा.