शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

​दिवाळीत दिसा स्टायलिश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 17:07 IST

कोणताही सण असो त्यात आपण स्टायलिश दिसावे असे प्रत्येकाला वाटते.

कोणताही सण असो त्यात आपण स्टायलिश दिसावे असे प्रत्येकाला वाटते. स्टायलिश दिसण्यासाठी आपण नवनवीन फॅशनेबल कपड्यांची खरेदी देखील करतो. यंदाची दिवाळी तोंडावर आली असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण कपड्यांची खरेदी करण्यासाठी लगबग करीत आहेत. विशेषत: महिला वर्गाला फॅशनेबल कपड्यांचे जास्त आकर्षण असते. बऱ्याचदा आपली कपड्यांची निवड चुकते आणि व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम जाणवतो. घेतलेले कपडे परिधान केल्यानंतर सूट होत नसल्याने ते वापरणे बंद करतो आणि घरातच पडून राहतात. आजच्या सदरात  दिवाळीत आपण स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे कपडे खरेदी करावेत याबाबत जाणून घेऊयात...जर या दिवाळीत आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांपेक्षा वेगळी पाडायची असेल, तर फॅशनेबल कपड्यांबरोबरच स्टायलिश कमरबेल्टची निवड करु शकता. तसेच आपल्या स्टाईलमध्ये वेगळेपण येण्यासाठी केप्स, इनबिल्ट दुपट्टा, ट्रेल्स आदि विविध डिजाइनर अ‍ॅससरीज परिधान करु शकता. त्यातच लहंगा, अनारकली आणि लच्छादेखील मार्केटमध्ये नव्या आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध असून वापरू शकता. केप्ससोबतच प्रिंट केलेला लांब ड्रेस, पेपलम्सने सजविलेला सुंदर स्कर्ट, लच्छा आणि दुपट्टासोबत लहंगा, ट्रेल्सवाला ब्लाऊज, पारदर्शी दुपट्टासोबत कोल्ड शोल्डर आणि आॅफ शोल्डर चोळी आदी विशेष शैलीचे कपडे अधिक आकर्षक आहेत ते वापरु शकता. सिल्क, जॉर्जेट, शिफॉन, कच्चा सिल्क आणि टूले आदी या सीजनमध्ये प्रमुख कपडे आहेत. विशेष म्हणजे बहुतेक डिझायनरांनी ड्रेससोबतच कमरबेल्टचा देखील समावेश केला आहे. पेस्टल रंगासोबत गडद रंगाचे कपडे खूपच आकर्षक दिसतात. जेव्हा आपण गडद रंगासोबत हलके पेस्टल रंगाचे कपडे परिधान करणार असू तर आपण नक्कीच सुंदर दिसणार. लहान मुलांनाही बनवा स्टायलिश पारंपरिक पोशाख असो की आधुनिक कॅज्युअल कपडे, मुलांच्या बाबतीत अशी काळजी घ्या की, ते कपडे परिधान केल्यानंतर दिसायला चांगले असावेत. मुलांपेक्षा मुली फॅशनच्या बाबतीत जास्तच उत्साही असतात. जर आपल्या लाडलीने पारंपरिक कपडे परिधान केले नसतील तर यावेळी नेट, ब्रोकेड, सिल्क, जॉर्जेटपासून बनविलेला लहंगा, सलवार कमीज, शरारा, लांब जॅकेट, विविध रंगाचे अनारकली सूट परिधान करण्यास देऊ शकता.  जर आपल्या मुलांना पारंपरिक पोशाख पसंत नसेल तर बाजारात उपलब्ध असलेल्या पश्चिमी पोशाखाची निवड करू शकता. फॉर्मल रूपांकन आणि प्रिंट वाले कपडे आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला उठावदार बनवतील. सीकुइंड जंपसूट, चमकते टॉप्स आणि पार्टीवेअर कपडे, गाऊन्स आणि अन्य फॅशनेबल कपडे सणासुदीत परिधान केले तर आपल्या राजकुमारीकडे नक्कीच सर्वांच्या नजरा वळतील. फॅशनच्या बाबतीत मुलेदेखील मुलींपेक्षा कमी नाहीत. आपल्या राजकुमाराचा लूक सर्वांपेक्षा वेगळा दिसण्यासाठी शेरवानी सूट, धोती-कुर्ता किंवा कुर्ता पायजमाची निवड करु शकता. तसेच व्यावहारिक कपड्यांमध्ये जीन्स, पायजमासोबतच बंद गळा सूट, नेहरू जॅकेट परिधान करु शकता. वेलवेटच्या कपड्यांपासून बनलेला नेहरु जॅकेट आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला हटके लूक देईल. शक्यतो दिवाळी येण्याअगोदरच मुलांच्या कपड्यांची खरेदी करुन घ्या. या दिवाळीत त्यांची चांगली तयारी करा, जेणेकरुन त्यांच्याकडेही लोकांच्या नजरा आकर्षिल्या जातील.ravindra.more@lokmat.com