डिकॅप्रियोला आॅस्कर ट्रॉफीचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 02:34 IST
अभिनेता लियोनाडरे डिकॅप्रियोचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे. ज्यात आॅस्कर समारंभानंतर डिकॅप्रियो हॉलीवुडमधील ‘अगो’ हॉटेलमध्ये जातो.
डिकॅप्रियोला आॅस्कर ट्रॉफीचा विसर
अभिनेता लियोनाडरे डिकॅप्रियोचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे. ज्यात आॅस्कर समारंभानंतर डिकॅप्रियो हॉलीवुडमधील ‘अगो’ हॉटेलमध्ये जातो. मात्र आॅस्कर ट्रॉफी न घेताच दारूची बाटली हातात घेऊन बाहेर पडतो. त्याच्या गाडीकडे जात असताना, त्याच्या मागे एक व्यक्ती हातात आॅस्कर ट्राफी घेवून घेवून धावत येत असल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये स्पष्ट दिसत आहे. डॉल्बी थिएटरमध्ये आॅस्कर पुरस्कार सोहळा संपल्यानंतर सेलिब्रेशन करण्यासाठी डिकॅप्रियो हॉटेलमध्ये गेला होता. मात्र सेलिब्रेशनच्या धुंदीत तो आॅस्कर ट्रॉफी हॉटेलमध्येच विसरला होता. हॉटेलमधील एका व्यक्तीच्या हि बाब लक्षात आली, त्यानी डिकॅप्रियोला ही ट्राफी परत दिली.