दीपिकाचा भाव वधारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 20:50 IST
एका कंपनीच्या तीन दिवसाच्या जाहिरातीसाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने तब्बल आठ कोटी रुपयांची मागणी केली.
दीपिकाचा भाव वधारला
एका कंपनीच्या तीन दिवसाच्या जाहिरातीसाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने तब्बल आठ कोटी रुपयांची मागणी केली. म्हणजेच दीपिकाची एका दिवसाची फी सुमारे २.६६ कोटी असेल. हा करार फायनल झाला तर तिची शाहरुख खान, आमीर आणि रणबीरशी केली जाईल. स्पोर्ट सेलिब्रिटींमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीची फी देखील जवळपास एवढीच आहे.एका एअरलाईन कंपनीच्या जाहिरातीसाठी ही बातचीत सुरु असल्याचे समजते. या करारावर स्वाक्षरी केली तर ‘ए’ लिस्टर असलेल्या दीपिकाची जाहिरात फी सर्वाधिक असेल. सध्या प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ या अभिनेत्री एक दिवसाच्या जाहिरातीसाठी एक कोटी रुपये फी घेतात.जाहिरातीसाठी दिवसाच्या हिशेबाने पैसे सामन्यता: अॅड शूटसाठी दिवसाच्या हिशेबाने पैसे दिले जातात. एका दिवसाच्या जाहिरातीसाठी दीपिका १.५ कोटी रुपये घेते. पण दीपिकाने या जाहिरातीसाठी शाहरुख, सलमान, आमीर आणि रणबीर यांच्या एवढेच पैसे मागून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे.पण दीपिकाच्या टीमला याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट बोलण्याचं टाळलं. त्यामुळे दीपिकाला एवढी मोठी रक्कम मिळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली आहे. बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिकाची मार्केट व्हॅल्यू वाढली असून पिकू आणि ‘बाजीराव मस्तानी’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरले होते.