हॉलिवूडमध्येही यशस्वी होणार दीपिका-प्रियंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:51 IST
हॉलिवूडमधील चित्रपटात नायिका होण्याचा पहिला मान ऐश्वर्या रॉयला मिळतो
हॉलिवूडमध्येही यशस्वी होणार दीपिका-प्रियंका
- दोन्ही नायिकांच्या चाहत्यांनी व्यक्त केला विश्वासभारतीय सिनेमाने आता एका शतकाचा प्रवास पूर्ण केला आहे. मुकपट, बोलपट, संगीतप्रधान चित्रपटांपासून तर नव्या तंत्रज्ञान व व्हिज्युअल इफेक्टचा वापर करून तयार करण्यात आलेल्या सिनेमापर्यंतचा हा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. येथील कलावंतांनीही अमर्याद लोकप्रियता मिळवली आहे. त्यांची ही ख्याती आता साता समुद्रापार पोहोचली असून जगातील सर्वांत मोठी फिल्म इंडस्ट्री असलेल्या हॉलिवूडनेही बॉलिवूडच्या कलाकारांची दखल घेतली आहे.अमरीश पुरी, कबीर बेदी, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी, इरफान खान, अनुपम खेर या कलावंताच्या पाठोपाठ बॉलिवूडच्या नायिकांनी देखील बॉलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत. प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण यांची तर हॉलिवूडमध्ये विशेष चर्चा सुरू आहे. याच विषयावर सीएनएक्सने त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता या दोन्ही नायिका हॉलिवूडमध्ये यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला. हॉलिवूडमधील चित्रपटात नायिका होण्याचा पहिला मान ऐश्वर्या रॉयला मिळतो. कॉमेडियन स्टिव्ह मार्टीनसोबतच्या ‘पिंक पँथर-2’ या चित्रपटातून तिने हॉलिवूडमध्ये पदार्पन केले. यानंतर ब्राईड अॅण्ड प्रिटड्युजेस, मिस्ट्रेस आॅफ स्पाईस व प्रोव्होक्ड या चित्रपटातून तिने भूमिका केल्या.तब्बूने नेमसेक व लाईफ आॅफ पाय या चित्रपटात भूमिका केल्या, मल्लीका शेरावत जॅकी चॅनच्या मिथ व हिस्स या चित्रपटात दिसली. राणी मुखर्जी हिने अमेरिकन टीव्ही मालिकेत भूमिका के ली आहे. प्रियंका चोप्रा हिने कॉन्टिको या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. या मालिकेसाठी तिला पिपल्स चॉईस अवॉर्डही मिळाला. ड्वेन जॉन्ससोबत बे-बॉच या चित्रपटात भूमिका करणार आहे. दीपिका पदुकोणची या मालिकेत सर्वाधिक चर्चा होत आहे यामागचे कारणही तसेच आहे. हॉलिवूड अॅक्शन स्टार वीन डिझेलच्या आगामी ट्रिपल एक्स, द रिर्टन आॅफ झेंटर केज या चित्रपटात ती नायिका आहे. आता तर श्रीलंकन सुंदरी व बॉलिवूड स्टार जॅकलीन फर्नाडिझ देखील हॉलिवूडपटात काम करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.