आर-रेटेडमध्ये डेडपूलची सर्वाधिक कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:44 IST
अभिनेता रयान रेनॉल्ड्स सुपरहिरो असलेला ‘डेडपूल’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ७४.५ कोटी डॉलरची कमाई केली आहे.
आर-रेटेडमध्ये डेडपूलची सर्वाधिक कमाई
अभिनेता रयान रेनॉल्ड्स सुपरहिरो असलेला ‘डेडपूल’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ७४.५ कोटी डॉलरची कमाई केली आहे. टिम मिलर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट गेल्या महिन्यात भारतात रिलीज करण्यात आला होता. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने २००३ मध्ये आलेल्या ‘द मॅट्रिक्स रिलोडेड’ (७४.२१ कोटी डॉलर) या चित्रपटाला मागे टाकले आहे. त्याचबरोबर आर-रेटेड चित्रपटाच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून देखील पुढे आला आहे. सुत्रानुसार उत्तर अमेरिकेत डेडपूलने ३४.९४ कोटी डॉलरची कमाई केली.