धक्कादायक : मराठी मॉडेलचा झालाय विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 21:55 IST
मराठी मॉडेल निकिता गोखले हिने आपला विनयभंग झाला होता, तसेच ट्यूशनच्या टीचरने हे शोषन केले होते असं म्हटले आहे.
धक्कादायक : मराठी मॉडेलचा झालाय विनयभंग
मराठी मॉडेल निकिता गोखले हिने आपला विनयभंग झाला होता, तसेच ट्यूशनच्या टीचरने हे शोषन केले होते असं म्हटले आहे. प्लेबॉय निकिता गोखले मॅगझिनसाठी टेस्ट न्यूड फोटोशूटवरुन चर्चेत आली होती. निकिताला प्लेबॉयचे फोटोग्राफर एरोल फ्रॅँकलिन यांनी फोटोशूटसाठी आॅफर दिली होती. मूळची नागपुरची निकिता हिने मिस इंडिया बिकिनी २०१५, मिस वर्ल्ड बिकिनी २०१५ स्पर्धेत भाग घेतला होता. प्लेबॉयच्या फोटोशूटसाठी निकिताने होकार दिल्याने मुंबईत फोटोशूट करण्यासाठी आले होते. फेसबुकवरील एका कॉमन फे्रंडच्या माध्यमातून निकिताची एरोलशी ओळख झाली होती.