- मोहिनी घारपुरे-देशमुख
उन्हाच्या झळा जसजशा वाढताहेत तसतसे जाडेभरडे, घट्ट कपडे अगदी नकोसे वाटू लागले आहेत. हे असं स्त्रिया, पुरूष, मुलं-मुली असं सगळ्यांनाच वाटत अहे. याबाबतीत पुरूषांचा विचार केला तर कडाक्याच्या उन्हात पुरूषांना शॉर्टस- बर्मुडा जास्त कूल फील देवू शकतात. शॉर्ट्स कॅरी करताना खूपच काळजी घ्यावी लागते. अन्यथा शॉर्ट्स घातलेले पुरूष अगदी काही सेकंदातच ओंगळवाणे दिसू लागतात. त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी बर्मुडा किंवा शॉर्ट्स घालणार असाल तर ती नीट कॅरी करा.घरात किंवा बाहेर जुजबी कामासाठी जातानाही शॉर्ट्स घालू शकता. फक्त त्याच्याबरोबर त्याला साजेसा एकंदर पेहेराव असायला हवा.एखादा प्लेन कलरचा शर्ट, किंवा फंकी टी शर्ट आणि शूजपेक्षाही लोफर्स घातले तर शॉर्ट्समधला लूक छान दिसतो.
शॉर्टस घालताना..
*शॉर्टस घालून शक्यतो आॅफीसला वगैरे जाणं टाळाच. तसं गेलात तर अगदीच इन्फॉर्मल आणि आॅड दिसत.
* मित्रांबरोबर फिरायला जाताना किंवा जंगल सफारी वगैरेला जात असताना बर्मुडा किंवा शॉर्ट्स घातलेली कूल दिसते.
* चट्टेरी पट्टेरी शॉर्ट्स वापरू नका त्या पायजम्यासारख्या दिसतात. त्याऐवजी ब्रँडेड स्टोअरमधून चांगल्या प्रतीच्या कापडाच्या जराशा स्टायलिश शॉर्ट्स खरेदी करा आणि वापरा.
* शॉर्ट्सवर हाफ स्लीव्हस शर्ट किंवा फुल स्लीव्हस डेनिम शर्टही चांगला दिसतो. टी-शर्ट तर एनी टाईम छानच दिसतो.
* रात्रीच्या वेळी फिरायला जातानाही शॉर्ट्स घालू शकता. मात्र त्यावर घातलेल्या टीशर्ट मधून बनीयन बाहेर लटकणार नाही याची काळजी घ्या. ‘रात्रीचीच तर वेळ आहे कोण पहातय मला’ असला विचार करून उगाच तुमचं हसं करून घेऊ नका.‘जस्ट बी स्टायलिश!’
* शॉर्ट्सबरोबर स्नीकर्सपेक्षाही लोफर्सच अधिक चांगले दिसतात. स्लीपर्स वगैरे अजिबात घालू नका ते अत्यंत शॅबी दिसतं.