मुलांची ओढ नव्हती : हेलेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 15:03 IST
अभिनेत्री हेलेन मिरेनचे म्हणणे आहे की, माझे स्वत:चे मुले असावेत अशी मला कधीच ओढ नव्हती. हेलेन निर्देशक टेलर हॅकफॉर्डसोबत १९८६ पासून रिलेशनशिपमध्ये राहत होती. १९९७ मध्ये ती विवाहबंधनात अडकली.
मुलांची ओढ नव्हती : हेलेन
अभिनेत्री हेलेन मिरेनचे म्हणणे आहे की, माझे स्वत:चे मुले असावेत अशी मला कधीच ओढ नव्हती. हेलेन निर्देशक टेलर हॅकफॉर्डसोबत १९८६ पासून रिलेशनशिपमध्ये राहत होती. १९९७ मध्ये ती विवाहबंधनात अडकली. मात्र मुले व्हावीत, ही मी कधीच अपेक्षा ठेवली नाही. मला मुले खुप आवडतात, ते खुप गोड असतात. मात्र मला मुले झाली नसल्याचा कधीच पश्चाताप झाला नाही. तसेच जेव्हा मी ‘पॅरेंटहुड’ हा चित्रपट बघितला तेव्हा मी रडत होते, हे पुर्णपणे खोटे आहे. त्याचबरोबर म्हातारपणात मी आजी होण्याचा अनुभव कधीच घेवू शकणार नाही, हे मला चांगल्या पद्धतीने ठाऊक असल्याचेही तिने सांगितले. हेलेनला दोन सावत्र मुले आहेत.