मुलांनो... फॅशनेबल साईड बॅग्जने द्या हटके लुक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:41 IST
सध्या प्रत्येक मुली आपली वेगळी छाप पाडण्यासाठी किंवा हटके लूक मिळविण्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीच्या फॅशनेबल साईड बॅग वापरतात. मात्र आता मुलींसाठीच नव्हे तर मुलांसाठीही मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या बॅग उपलब्ध आहेत.
मुलांनो... फॅशनेबल साईड बॅग्जने द्या हटके लुक !
सध्या प्रत्येक मुली आपली वेगळी छाप पाडण्यासाठी किंवा हटके लूक मिळविण्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीच्या फॅशनेबल साईड बॅग वापरतात. मात्र आता मुलींसाठीच नव्हे तर मुलांसाठीही मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या बॅग उपलब्ध आहेत. मुले आपले बरेच साहित्य त्यात ठेवू शकतील तसेच त्यांना वापरणेही सोईस्कर होईल अशा फॅशनेबल साईड बॅग खास मुलांसाठी नवनवीन डिझाइन्स आणि आकारात आल्या आहेत. या नव्या फॅशनेबल ट्रेंडने मुलांच्या पर्सनॅलिटीला हटके लूक मिळू शकतो. मुलांसाठी साईड बॅग्ज, रकसॅक, कंबरेला बांधायचे साईड पाऊच, बेल्ट्स अशा अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या बॅगचे वजनही खूप कमी असते, यामुळे ते वापरणे सोयीस्कर ठरते. या बॅगमुळे हातही मोकळे राहतात. सोबतच फॅशनही सांभाळली जाते. यामुळे कॉलेजगोईंग तरुणच काय तर तरुणींमध्ये सुद्धा याची क्रेझ सध्या बघायला मिळत आहे.ही फॅशन फक्त शाळा-कॉलेजमध्येच नाही, तर ट्रेकर्स, जिमला जाणाºया मंडळींतही लोकप्रिय ठरत असून घराची किल्ली, रुमाल किंवा नॅपकीन, मोबाइल, थोडेसे पैसे चालता चालता चघळायला एखाद-दोन गोळ्या असे साहित्य सहज बसू शकते. यात ट्रेनची किंवा बसची तिकिटे, चोटा डिजीकॅम, टॉर्च, सहज बसते. अशा या साइड बॅग्ज चा उपयोग ट्रेकिंग, लांबचा प्रवास, जिम, मार्निंग वॉक, मोबाइल, पैसे ठेवण्यासाठी होतो.