वुमन गोल्फ टुर्नामेंटमध्ये कॅटलिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:40 IST
रिअॅलिटी टीव्ही स्टार कॅटलिन जेनर वुमन प्रो-एएम गोल्फ एएनए स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. सुत्रानुसार ६६ वर्षीय कॅटलिनचे या स्पर्धेत खेळणे जवळपास निश्चित झाले आहे.
वुमन गोल्फ टुर्नामेंटमध्ये कॅटलिन
रिअॅलिटी टीव्ही स्टार कॅटलिन जेनर वुमन प्रो-एएम गोल्फ एएनए स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. सुत्रानुसार ६६ वर्षीय कॅटलिनचे या स्पर्धेत खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या वर्षी तिच्यावर लिंग सर्जरी करण्यात आली. पूर्वी ती ब्रुस जेनर नावाने ओळखले जात होती. जेनरच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही स्पर्धा कॅलिफोर्नियाच्या रॅनचो मिराज मिशन हिल्स कंट्री क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. कॅटलिनने निश्चय केला की, ती या स्पर्धेत भाग घेणार असून, महिलांचे प्रतिनिधित्त्व करणार आहे.