अपारंपरिक दरवाजे ठरताहेत कारचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:50 IST
कारच्या अपारंपरिक दरवाज्यांमधील सिस्कॉर डोअर्स व गुल्लविंग डोअर्सची माहिती
अपारंपरिक दरवाजे ठरताहेत कारचे आकर्षण
कारच्या अपारंपरिक दरवाज्यांमधील सिस्कॉर डोअर्स व गुल्लविंग डोअर्सची माहिती जाणून घेतली. पारंपरिक दरवाज्यांपेक्षा नव्या डिझाईन्सचे डोअर्स कारला आकर्षक करीत असतात. याच मालिकेत आपण यावेळी आणखी काही अपारंपरिक दरवाज्यांची माहिती जाणून घेणार आहोत.बटरफ्लाय डोअरकार डोअरचा हा प्रकार सिस्कॉर डोअर सारखाच असतो मात्र त्यात थोडा बदल आपल्याला दिसून येतो. उघडताना हे दरवाजे वरच्या भागाला जातात, त्यानंतर ते आणखी जास्त खुले होतात. यामुळे कारमध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी जास्त जागा मिळते. विशेषत: स्पोर्टस कारमध्येअसे दरवाजे लावले जातात. इन्झो फ रारी व मॅक्लरेन एफ 1 मध्ये तुम्हाला हे हमखास पाहवयास मिळतील.सुसाईड डोअरअसे दरवाजे साधारणत: आता पहावयास मिळत नाहीत. कारच्या मागील दारावर लावलेले हे दरवाजे उलट्या दिशेन उघडले जातात. अनेकांना आश्चर्यात टाकणारा हा डोअर्सचा पॅटर्न असल्याने त्यांना सुसाईट डोअर्स हे नाव देण्यात आले आहे. उघडताना व बंद करताना थोडी अडचण होते.सुसाईड डोअर्स हे रोल्स रॉयसमध्ये असतात. हवेचा जादा दाब पडत असल्याने त्याचे चलन बंद झाले आहे.