बायकोच निघाली आॅनलाईन प्रेयसी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 12:08 IST
प्रत्येकाचा जोडीदार स्वर्गातच निवडलेला असतो म्हणतात.
बायकोच निघाली आॅनलाईन प्रेयसी!
प्रत्येकाचा जोडीदार स्वर्गातच निवडलेला असतो म्हणतात.‘रब ने बना दी जोडी’च म्हणा ना. मग आता वरूनच जर सगळे फिक्स होऊन आले असेल तर काही करा ते बदलता येत नाही. बरेली शहरातील या जोडप्याच्या बाबतीतही तेच घडले. हे जोडपे सतत भांडायचे, एकमेकांवर रागराग रागवायचे.दोन शब्द प्रेमाचे बोलायला त्यांना जड जायचे. रोज रोजच्या कटकटीला कंटाळून मग दोघेही नाव बदलून फेसबुकवर ‘दुसरा कोणी’ शोधू लागले. काही महिन्यांच्या शोधानंतर त्यांना आपापला ‘इंटरेस्टिंग’ जोडीदार सापडला. तीन महिने चॅटिंग करून एकमेकांना भेटण्याचे ठरवले. मग दिलेल्या वेळेवर ठरलेल्या जागी पोहचल्यानंतर दोघांनाही काय करू नि काय नाही असे झाले.कारण पत्नीपासून दूर पळणाºया पतीसमोर त्याची आॅनलाईन प्रेयसी म्हणून चक्क बायकोच उभी होती. दोघांमध्ये मग तेथेच कडाक्याचे भांडण पेटले. इतके की ते सोडविण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नवराबायकोतील भांडण म्हणून दोघांवर गुन्हा न नोंदविता त्यांना कौंटुबिक समुपदेशन कार्यशाळेत पाठविण्यात आले. अशा प्रकारचा योगायोग जुळून येण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण, या घटनेची पुनरावृत्ती घडूच शकणार नाही असे अजिबात नाही.