शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

​बॉलिवूड ‘मि. अ‍ॅँड मिस इंडिया २०१७’ स्पर्धेसाठी खानदेशातील ३१ जणांनी निवड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 16:40 IST

जळगाव येथील आय. एन. आय. एफ. डी. या संस्थेच्या सहकार्याने दिल्ली येथील स्टुडिओ १९ फिल्म्स यांच्या मार्फ त बॉलिवूड ‘मि. अँड मिस इंडिया २०१७’ या स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली.

-Ravindra Moreजळगाव येथील आय. एन. आय. एफ. डी. या संस्थेच्या सहकार्याने दिल्ली येथील स्टुडिओ १९ फिल्म्स यांच्या मार्फ त बॉलिवूड ‘मि. अँड मिस इंडिया २०१७’ यास्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेत ८० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला होता. त्यातून ३१ जणांची  निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. यात २१ मुले व १० मुलींचा समावेश आहे. या स्पर्धेत ज्यांची निवड झाली त्या सर्व मुलांना बॉलिवूड तिकिट देण्यात आले. अंतिम फेरी  २४ जून रोजी पंचताराकित  हॉटेल क्राउन प्लाझा, नवी दिल्ली येथे होणार आहे. मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्या दुष्टिने मुलांनी पुढील स्पर्धेसाठी मेहनत घेण्यास सुरवात केली आहे. अंतिम फेरीच्या निवड चाचणीसाठी ज्यूरी म्हणून बॉलिवूड कलाकार अरबाज खान, सना खान, रजनीश दुग्गल,विशाल पांडे, यश अलवंत हे असणार आहेत. खान्देशातील तरुणांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आय. एन. आय. एफ. डी. या संस्थेच्या संचालिका संगीता  पाटील यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जळगावात असा इव्हेंट प्रथमच घेण्यात आला. या स्पर्धेत फॅशन डिझाईन, अभिनय आणि मॉडेलिंग यासाठी चाचणी घेण्यात आली. ज्युरी  म्हणून चित्रपट दिग्दर्शक विशाल दुग्गल, फॅशन डिझाइनर राशी वर्मा आणि आय. एन. आय. एफ. डी. च्या संचालिका संगीता पाटील यांनी काम पहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय. एन. आय. एफ. डी. तील लक्ष्मी मलबारी, सुप्रिया जाधव, काजल महाजन, जयश्री मोरे, दीपाली काळे, अंजुलता सोनी, यांचे अनमोल सहकार्य मिळाले.