बिग बॉस मॉडेल पूजा मिश्रावर गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 14:24 IST
मॉडेल आणि बिग बॉस-५ मधली स्पर्धक पूजा मिश्राने जयपूरमधील ३ लोकांविरोधात गँगरेप केल्याची तक्रार नोंदवली आहे. पूजा मिश्रा १ जूनला जयपूरमध्ये एका शोच्या शुटींगसाठी आली होती.
बिग बॉस मॉडेल पूजा मिश्रावर गँगरेप
मॉडेल आणि बिग बॉस-५ मधली स्पर्धक पूजा मिश्राने जयपूरमधील ३ लोकांविरोधात गँगरेप केल्याची तक्रार नोंदवली आहे. पूजा मिश्रा १ जूनला जयपूरमध्ये एका शोच्या शुटींगसाठी आली होती.पूजाने तीन व्हिडियोग्राफर विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. शूटिंगनंतर पूजाने तिन्ही लोकांना हॉटेल ग्रँड उनियारामध्ये पार्टी दिली. पूजाने आरोप लावला की, डिनरनंतर तिघांनी तिला गुंगीचे पदार्थ खायला दिले आणइ तिच्यावर बलात्कार केला.पूजा याआधीही अनेकदा वादात होती. काही दिवसांपूर्वी पूजाचा एका हॉटेल स्टाफला मारहाण करतांनाचा व्हिडिओ समोर आला होता. पूजाने यावर प्रतिक्रिया देत हॉटेल स्टाफवर छेड काढल्याचा आरोह लावला होता.