बोपण्णाने पत्नीसह केला ‘बेयॉन्से कॉन्सर्ट’ एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 20:24 IST
बोपण्णाची पत्नी सुप्रिया अन्नैया बेयॉन्सची खूप मोठी फॅन असल्याने त्याने तिला हे सरप्राईज दिले.
बोपण्णाने पत्नीसह केला ‘बेयॉन्से कॉन्सर्ट’ एन्जॉय
भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा सध्या लंडनमध्ये प्रतिष्ठेच्या ‘विम्बलडन ग्रँडस्लॅम’ टेनिस स्पर्धेत खेळत आहे. मिक्स्ड डबल्स विभागात खेळणारा बोपण्णा स्पर्धेत विजयपथावर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळायचे म्हटल्यावर तणाव तर असणारच.हाच तणाव कमी करण्यासाठी बहुधा बोपण्णा पोहचला ‘बेयॉन्से’च्या कॉन्सर्टमध्ये. रविवारी लंडनमध्ये जगप्रसिद्ध गायिका बेयॉन्सेचा वेम्बले स्टेडिअम येथे कॉन्सर्ट झाला. बोपण्णाची पत्नी सुप्रिया अन्नैया बेयॉन्सची खूप मोठी फॅन असल्याने त्याने तिला हे सरप्राईज दिले.‘क्वीन बे’च्या बेधुंद स्वरात दोघांनी खूप एन्जॉय केला. बोपण्णा-सुप्रिया व्यतिरिक्त महेश भूपती आणि लारा दत्ता हे जोडपेदेखील त्यांच्या काही मैत्रिणींसोबत कॉन्सर्टमध्ये होते. }}}}