शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वोत्कृष्ट मत्स्यालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 02:14 IST

​जगातील सर्वोत्कृष्ट मत्स्यालयेया पृथ्वीतलावरील समुद्रापेक्षा दुसरे कोणतेही आश्चर्य नाही. अर्थात खºया जीवनाशी त्याची तुलना करता येणे अशक्य आहे. मत्स्यालयाची समुद्रातील प्राणीजीवनाशी तुलना करता येत नाही. मात्र ज्यांना समुद्रात जाता येत नाही अशांसाठी मत्स्यालयाद्वारे तो अनुभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जगातील अशाच सर्वोत्कृष्ट मत्स्यालयाची माहिती देत आहोत...

या पृथ्वीतलावरील समुद्रापेक्षा दुसरे कोणतेही आश्चर्य नाही. अर्थात खºया जीवनाशी त्याची तुलना करता येणे अशक्य आहे. मत्स्यालयाची समुद्रातील प्राणीजीवनाशी तुलना करता येत नाही. मात्र ज्यांना समुद्रात जाता येत नाही अशांसाठी मत्स्यालयाद्वारे तो अनुभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जगातील अशाच सर्वोत्कृष्ट मत्स्यालयाची माहिती देत आहोत...‘सी’ मत्स्यालय, सिंगापूरदक्षिण पूर्व आशियाई (एसईए) मत्स्यालय २०१२ साली खुले करण्यात आले. हे जगातील दुसरे मोठे मत्स्यालय आहे. आश्चर्यकारक मत्स्यालयापैकी सर्वोच्च स्थानावर असणारे आहे. रिसोर्ट वर्ल्ड सेन्टोसा कॉम्प्लेक्सचा हा एक भाग आहे. यामध्ये १२ कोटी गॅलन इतके पाणी असून, सुमारे ८०० प्रजातींचा यामध्ये समावेश आहे. मंटा रेज, डॉल्फिन्स, शार्क, जापनीज खेकडे हे प्रमुख आहेत. २७ फूट उंचीच्या खिडकीमधून आपणास पाहता येते.जॉर्जिया मत्स्यालय, अटलांटाजगातील सर्वात मोठे आणि आश्चर्यकारक मत्स्यालयापैकी एक. यामध्ये १,२०,००० समुद्री प्राणी आहेत, ज्यामध्ये ५०० प्रजातींचा समावेश आहे. २००५ साली हे खुले करण्यात आले. २५० कोटी डॉलर इतका खर्च यावर करण्यात आला आहे. यात ६० दालने आहेत. पाच प्रभागात विभागली आहेत. मुख्य विभागात ६.३ गॅलन पाणी आहे. त्यात व्हेल शार्क आहेत.लिओसिओनोग्राफिक, व्हॅलेन्सियास्पॅनिश शहरातील कला आणि विज्ञान कॉम्प्लेक्सचा हा भाग आहे. हा समुद्री कॉम्प्लेक्स आहे. युरोपमधील सर्वात मोठे आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणून याची ओळख आहे. १.९ दशलक्ष गॅलन इतके पाणी यात आहे. ४५ हजाराहून अधिक समुद्री प्राणी यात आहेत, त्यात ५०० प्रजाती आहेत. हे मत्स्यालय अनेक प्रकारात विभागले गेले आहे. शांघाय समुद्री मत्स्यालय, शांघायआशियामधील सर्वात मोठ्या मत्स्यालयापैकी एक आणि आश्चर्यकारक मत्स्यालय आहे. नऊ विभागात याची विभागणी करण्यात आली आहे. अंटार्क्टिक, आॅस्ट्रेलिया यांचा यात समावेश आहे. चीनचा विभाग खूृप प्रसिद्ध आहे. यांगत्झे नदीमधील विविध प्रजाती यात ठेवण्यात आल्या आहेत. या टनेलमधून जाताना अनोखा अनुभव येतो.उषाका मरीन वर्ल्ड, दर्बनहे फक्त मत्स्यालय नसून, थीम पार्क देखील आहे. यामध्ये ३२ तलाव आहे, ज्यामध्ये लाखो गॅलन पाणी आहे. डॉल्फिन, शार्क अशा समुद्री प्राण्यांचा यात समावेश आहे. या ठिकाणी अनेक कॅफे, शॉप्स हे देखील आहेत, ज्यांचा आनंद घेता येतो. कॉर्गो रेस्टारंट आहे. हे मत्स्यालय पाहताना तुम्ही जेवणाचा आनंद लुटू शकता.माँटेरे बे अ‍ॅक्वॅरिअम, कॅलिफोर्नियासील, व्हेल, जेली फिश, शार्क यांचा यांचा माँटेरे बे अ‍ॅक्वॅरियम यांचा यात समावेश करण्यात आला आहे. हे मुख्य आणि महत्वाचे मत्स्यालय आहे. १९८४ साली हे खुले करण्यात आले. मध्यभागी दोन खूप मोठे तलाव आहेत.