रोजच्या रोज बेडरूम आवरण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 04:10 IST
सकाळी झोपेतून उठलो की, आपल्यापैकी किती जण अंथरुन उचलतात? तुम्हाला जर वाटत असेल की यात काय मोठी गोष्ट आहे तर पुढील फायदे जाणून घ्या...
रोजच्या रोज बेडरूम आवरण्याचे फायदे
सकाळी झोपेतून उठलो की, आपल्यापैकी किती जण अंथरुन उचलतात? बेड आवरतात? तुम्हाला जर वाटत असेल की यात काय मोठी गोष्ट आहे तर पुढील फायदे जाणून घ्या...१. बेडवर व्यवस्थित केलेले बेडशीट तुमच्या बेडरूमला स्वच्छ आणि टापटिप लूक देते.२. दिवसभर थकून-भागून आल्यावर अस्थाव्यस्थ, घाणेरडे बेडशीट पाहून कशी उबग येते? पण विचार करा छानपैकी आवरलेला बेडपाहून थकवा तर दूर होतोच, सोबत सकारत्मक ऊर्जादेखील येते. ३. रोजच्या रोज बेडशीट झटकून टाकल्यामुळे त्यावर असणारी सर्व घाण, छोट छोटे केस साफ होऊन बेड स्वच्छ होतो.४. कितीही वेळ पडले तरी झोप येत नाही असे होते का? तर मग झोपण्यापूर्वी बेडशीट, उशी, अंथरून, ब्लँकेट व्यवस्थित झटकून स्वच्छ करावे. बघा कशी शांत झोप लागते. ५. स्वत:चा बेड स्वत: आवरण्याच्या कामाचे स्वत:लाच दिलेले गिफ्ट म्हणूनही तुम्ही याकडे पाहू शकता. नीटनेटक्या पलंगावर झोपताना मानसिक शांतीदेखील मिळते.६. रोज रोज बेडरूम आवरल्यामुळे तुम्हाला याची सवय होऊन जाईल. प्रॅक्टिस वाढल्यामुळे आवरण्यासाठी तुम्हाला वेळही लागणार नाही.