शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रिएटिव्ह’ होण्यासाठी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 16:40 IST

आज प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध प्रकारचे काम करीत आहेत. काहीजण काम म्हणून काम करतात, तर काहीजण तेच काम अतिशय कौशल्यपूर्ण करुन आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवितात. यालाच सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी असे म्हणतात.

-रवींद्र मोरे आज प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध प्रकारचे काम करीत आहेत. काहीजण काम म्हणून काम करतात, तर काहीजण तेच काम अतिशय कौशल्यपूर्ण करुन आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवितात. यालाच सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी असे म्हणतात. आपल्या मनातील संकल्पना कामात वापरुन हातात असलेले काम अधिक चांगल्या प्रकारे कसे पार पाडता येईल याकडे लक्ष दिले तर आपणही क्रिएटिव्ह होऊ शकतो. असे क्रिएटिव्ह काम केले तरच आपल्याला कामाचे समाधान तर मिळतेच शिवाय त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या करिअरवर होतो. आजच्या सदरात आपण आपल्या कामाच्या ठिकाणी क्रिएटिव्ह होण्यासाठी आपल्याजवळ नेमके काय असायला हवे याबाबत जाणून घेऊया...* एक नोंदवही जवळ असू द्याआपण कुठेही असाल तर आपल्या जवळ एक नोंदवही जवळ असावीच. परिसरात फिरताना आपण काही निरीक्षण केल्यावर तेथील अनुभव, विचार, कथा आदी नोंदवहीत नोंदवू शकता. फावल्या वेळेत जेव्हाही वेळ मिळेल त्याचे वाचन करुन त्यावर विचारमंथन करु शकता. यातून कदाचित आपणास आपल्या कामात प्रमोट करणारी एखादी आयडिया मिळू शकते. * स्वत:भोवती प्रेरणादायी वातावरण निर्माण करामनाला नेहमी उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करा, यासाठी जेही काही प्रेरणादायी वाटले तर ते संग्रहीत करुन सहज नजर पडेल अशा ठिकाणी किंवा भिंतीवर चिकटवा. त्यात एखाद्या वृत्तपत्रातील कात्रण किंवा आवडलेल्या ठिकाणचा फोटो यांचा समावेश करा. या कात्रणांचे ही कात्रणे भविष्यात कशाप्रकारे उपयोगी ठरतील याची तुम्हाला आताच कल्पना येणार नाही. पण ती उपयोगी ठरतील हे मात्र नक्की. * क्रिएटिव्ह गोष्टींसाठी वेळ काढाव्यायाम करणे किंवा योगासने करणे यासाठी जशी नियमित प्रॅक्टिसची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे क्रिएटिव्हिटी वाढण्यासाठी वेळ द्यायला हवा. आठवड्यातील काही वेळ क्रिएटिव्ह गोष्टींसाठी राखून ठेवा. ही वेळ फक्त स्वत:साठी असेल. यावेळेत स्वत:ला मोकळे सोडा, मुक्तपणे श्वास घ्या, हाताने काही काम करा किंवा निवांत भटकंती करा. यामुळे आपल्या मेंदूला सकारात्मक एनर्जी मिळेल व आपल्यातील सृजनशीलता वाढण्यास मदत होईल.   * दिनचर्येत बदल करारोज एकच काम केल्याने मनावर मरगळ येऊ शकते. याचाच परिणाम आपल्या कामावर होतो. कामाची गुणवत्ता ढासळू शकते. ही मरगळ घालविण्यासाठी रोजच्या कामापेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. काम तेच करा पण थोडी वेगळी पद्धत वापरा. रोज ज्या रस्त्याने जात असाल तर एखाद्या दिवशी तो रस्ता बदला. रोज जे खाता त्यापेक्षा काहीतरी वेगळे खा. रोज तोच व्यायाम करण्यापेक्षा एखाद्या दिवशी व्यायाम म्हणून डान्स करुन पहा. या छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या क्रिएटिव्ह मेंदूला तरतरी प्रदान करतील. * आपल्या डिक्शनरीतून ‘नाही’ हा शब्द डिलीट कराया जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हा विचार सतत मनात असू द्या. आवाहनांना नेहमी सामोरे जा. कधीच कुठल्या गोष्टीला नकार देऊ नका. त्याऐवजी ते काम यशस्वी होण्यासाठी पर्याय काय असू शकतो हे शोधा. प्रत्येक कामात नकारघंटा वाजविण्याऐवजी नवीन आव्हाने स्वीकारा. स्वत:ला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा. त्यामुळे आपली क्रिएटिव्हीटी वाढण्यास नक्कीच मदत होईल